
मुंबई, 08 सप्टेंबर (हिं.स.)। भारतातील अग्रेसर डिजिटल फिक्स्ड इनकम इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म असलेल्या 'बॉन्ड्सइंडिया'ने आज 'डिजिफिन' या नव्या नावाने आपल्या रीब्रँडिंगची अधिकृत घोषणा केली. ही नवी ओळख कंपनीच्या केवळ बॉण्ड-केंद्रित मार्केटप्लेसवरून फिक्स्ड इनकम गुंतवणुकीसाठी एका सर्वसमावेशक डिजिटल प्लॅटफॉर्म बनण्याच्या दिशेने झालेल्या विकासाचे प्रतीक आहे. रीटेल गुंतवणूकदार, बँका आणि संस्थांसाठी गुंतवणूक अधिक सोपी, पारदर्शक आणि सुलभ बनवतानाच डिजिटल फिक्स्ड इनकम उत्पादनांचा विस्तृत संच प्रदान करण्याचा डिजिफिनचा दृष्टिकोन आहे. या रीब्रँडिंगला 'एशिरस ग्रुप' आणि 'डिजिफिन फाउंडेशन'चा भक्कम पाठिंबा लाभला आहे.
या घोषणेप्रसंगी बोलताना डिजिफिनचे संस्थापक अंकित गुप्ता म्हणाले, जेव्हा आम्ही बॉन्ड्सइंडिया म्हणून सुरुवात केली, तेव्हा रीटेल गुंतवणूकदारांसाठी बॉन्ड्समधील गुंतवणूक सोपी करणे हा आमचा उद्देश होता. गेल्या काही वर्षांत आम्ही १.७५ लाखांहून अधिक वापरकर्त्यांचा विश्वास संपादन केला आहे. डिजिफिन याच मोठ्या व्हिजनचे प्रतिनिधित्व करतो. आमच्या वाढीचा पुढील टप्पा मेट्रो शहरांच्या पलीकडे विस्तार करणे, उदयोन्मुख शहरांपर्यंत पोहोचणे आणि तंत्रज्ञानावर आधारित गुंतवणुकीद्वारे अधिक भारतीयांना त्यांच्या कष्टाची बचत दीर्घकालीन संपत्तीमध्ये रूपांतरित करण्यास मदत करण्यावर केंद्रित असेल. ते पुढे म्हणाले, कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये रीटेल सहभाग अजूनही सुरुवातीच्या टप्प्यात आहे आणि याबद्दलची जागरूकता केवळ १०% आहे. ही अप्रवेशित बाजारपेठ डिजिफिनसाठी फिक्स्ड इनकम गुंतवणुकीचा विस्तार करण्याची आणि लाखो पहिल्यांदा गुंतवणूक करणाऱ्यांना अधिकृत गुंतवणूक प्रणालीमध्ये आणण्याची मोठी संधी प्रस्तुत करते.
डिजिफिनने आतापर्यंत ९० बॉण्ड इश्यूजमध्ये १४,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांची सुविधा उपलब्ध करून दिली असून आज १.७५ लाखांहून अधिक वापरकर्त्यांना सेवा देत आहे. पात्र गुंतवणूकदार अवघ्या ३ मिनिटांत केवायसी पूर्ण करून या प्लॅटफॉर्मवर जोडले जाऊ शकतात. आपल्या वाढीच्या पुढील टप्प्यात कंपनीचे पुढील ५ वर्षांत ५० हून अधिक शहरांमध्ये उपस्थिती प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट असून, भारताच्या टियर III आणि टियर IV बाजारपेठेवर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल. तसेच पुढील २ वर्षांत मनुष्यबळ दुप्पट करण्याचे नियोजन आहे. भारताची गुंतवणूक प्रणाली सध्या महत्त्वाच्या बदलातून जात असून देशात २१.६ कोटींपेक्षा जास्त डिमॅट खाती आहेत. कॉर्पोरेट बॉण्ड मार्केट गेल्या दशकात १२ टक्के वार्षिक दराने वाढले असले, तरी अजूनही १ टक्के पेक्षा कमी भारतीय कुटुंबे यात गुंतवणूक करतात. ही तफावत भरून काढण्यासाठी डिजिफिन पुढाकार घेत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule