अलिबागमध्ये घरफोडी; ८ लाख ११ हजारांचा ऐवज लंपास
रायगड, 08 सप्टेंबर, (हिं.स.)। अलिबाग शहरातील विद्यानगर परिसरात घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण ८ लाख ११ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विद्यानगर येथील प्रमि
Burglary in Alibaug; Valuables worth ₹8.11 lakh stolen.


रायगड, 08 सप्टेंबर, (हिं.स.)। अलिबाग शहरातील विद्यानगर परिसरात घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण ८ लाख ११ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विद्यानगर येथील प्रमिला को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीतील बी विंग, रूम क्रमांक ०२ येथे फिर्यादी यांच्या घरात अज्ञात आरोपीने प्रवेश केला. फिर्यादी यांच्या संमतीशिवाय घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने लबाडीच्या इराद्याने चोरून नेण्यात आले. या घटनेत एकूण ८,११,५०० रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १५१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०५(अ) व ३३१(३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अधिकारी पोसई धोंडे करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande