
छत्रपती संभाजीनगर, 08 सप्टेंबर, (हिं.स.)। छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी गणेशोत्सवाची परंपरा आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित केले. सार्वजनिक गणेश मंडळांना त्यांच्या सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे सादरीकरण करण्याची संधी मिळावी, अशी अपेक्षा उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी व्यक्त केली. तसेच गणेशोत्सवाच्या दोन दिवस आधीपासून ‘मद्यविक्री बंदीचा दिवस’ (ड्राय डे) घोषित करण्याची मागणी त्यांनी केली.
महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त कल्पना पिंपळे यांनी स्वच्छता, रस्ते, विसर्जनस्थळे तसेच अन्य नागरी सुविधांबाबत महानगरपालिकेने केलेल्या तयारीची माहिती दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis