सोने पुन्हा महागले; चांदीही कडाडली
जळगाव, 08 सप्टेंबर (हिं.स.) | जळगाव शहरातील सराफ बाजरात मंगळवारी सोन्याच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळाली. याचबरोबर ३ दिवसांपासून स्थिर असलेल्या चांदीच्या दराने आज चांगलीच उसळी घेतली.आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १००० रुपयांची वाढ झाली.
gold and silver


जळगाव, 08 सप्टेंबर (हिं.स.) | जळगाव शहरातील सराफ बाजरात मंगळवारी सोन्याच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळाली. याचबरोबर ३ दिवसांपासून स्थिर असलेल्या चांदीच्या दराने आज चांगलीच उसळी घेतली.आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १००० रुपयांची वाढ झाली. तर १ किलो चांदी ३००० रुपयांनी महागली. अचानक झालेल्या या दरवाढीमुळे लग्नसराई, सणासुदी किंवा गुंतवणुकीसाठी सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आता अधिक रक्कम मोजावी लागणार आहे.

जळगाव सराफ बाजारात काल सोमवारी १ तोळा सोन्याचे दर विनाजीएसटी १ लाख ५१ हजार ५०० रुपयांवर होते. या सोन्याच्या दरात आज १००० रूपयांची वाढ होऊन हे सोनं १ लाख ५२ हजार ५०० रुपयांवर आले आहे. तर मागील ३ ते ४ दिवसांपाासून स्थिर असलेल्या चांदीच्या दरात आज तब्बल ३००० रूपयांची वाढ झाली. यामुळे १ किलो चांदीचे विनाजीएसटी दर २ लाख ३६ हजार रुपयांवरून २ लाख ३९ हजार रूपयांवर आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील बदल आणि त्याचा देशांतर्गत बाजारावर होणारा परिणाम यामुळे आगामी काळात दरात आणखी चढ-उतार होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सोन्या-चांदीच्या किमतीतील वाढीकडे सराफ व्यावसायिकांसह ग्राहकांचेही लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande