ट्रान्सफार्मर फोडून तांबातार चोरणाऱ्या सराईतास अटक
अमरावती, 08 सप्टेंबर (हिं.स.)। महावितरण कंपनीच्या मालकीचे ट्रान्सफार्मर फोडून तांबातार चोरणाऱ्या सराईतास तळेगाव दशासर पोलिसांनी अटक केली आहे. जितेंद्रसिंग संतोषसिंग टांक (वय ३४, रा. अलाना, गेवराई, जि. छत्रपती संभाजीनगर), असे अटक संशयिताचे नाव आहे.
ट्रान्सफार्मर फोडून तांबातार चोरणाऱ्या सराईतास अटक


अमरावती, 08 सप्टेंबर (हिं.स.)।

महावितरण कंपनीच्या मालकीचे ट्रान्सफार्मर फोडून तांबातार चोरणाऱ्या सराईतास तळेगाव दशासर पोलिसांनी अटक केली आहे. जितेंद्रसिंग संतोषसिंग टांक (वय ३४, रा. अलाना, गेवराई, जि. छत्रपती संभाजीनगर), असे अटक संशयिताचे नाव आहे. तळेगाव दशासर पोलिसांनी २२ ऑगस्ट २०२६ रोजी राजेश अशोक चांडक (रा. देवळी, जि. वर्धा याच्या तक्रारीवरून त्यांच्या पत्नीचे नावे मोहिनी क्वॉट्स वर्ल्ड नावाची जिनिंग फॅक्ट्री असून, येथे ६३० केव्ही क्षमतेचे ट्रान्सफार्मर आहे. ते १८ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास फोडून त्यातून कॉपर कॉईल चोरीस गेले होते. तळेगाव दशासर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तपास करीत असताना जितेंद्रसिंग संतोषसिंग टांक याला नेवासा, अहिल्यानगर येथून अटक करून आणले. चौकशीअंती त्याने तळेगाव दशासर हद्दीतील जिनिंगमधील ट्रान्सफार्मर फोडून तांबातार चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरलेल्या मालापैकी ७५ हजार रुपयांचा ५० किलो तांबातार जप्त केला आहे. ठाणेदार किरण औटे, उपनिरीक्षक स्वप्नील रणखांब, युवराज मानमोठे, विनोद राठोड, संदेश चव्हाण, प्रीतम यादव, यशवंत काळे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. संशयित जितेंद्रसिंग विरुद्ध तांबातार चोरीचे अमरावतीसह इतर जिल्ह्यातही गुन्हे दाखल आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande