मुंबईतील कैवल्यधाम ईश्वरदास चुन्नीलाल योगिक सेंटरच्या भाडेपट्ट्याचे सवलतीच्या दराने नुतनीकरणास मंजुरी
मुंबई, 08 सप्टेंबर, (हिं.स.)। मुंबईतील भुलेश्वर येथील कैवल्यधाम ईश्वरदास चुन्नीलाल योगिक सेंटरच्या भाडेपट्ट्याचे सवलतीच्या दराने नुतनीकरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

कैवल्यधाम ईश्वरदास चुन्नीलाल योगिक सेंटर ही संस्था आरोग्यविषयक क्षेत्रात कार्यरत असून ती योग, प्राणायम, निसर्गोपचार, आयुर्वेद यांचे शिक्षण, प्रशिक्षण आणि उपचार पुरवते. येथे वैज्ञानिक दृष्ट्या योग संशोधन, पदव्युत्तर डिप्लोमा अभ्यासक्रम आणि दैनंदिन योगसत्रे घेतली जातात. या संस्थेच्या जमिनीच्या भाडेपट्टयाची मुदत संपल्याने पुढील 30 वर्षांसाठी वार्षिक 12 रूपये या दराने भाडेपट्टा नुतनीकरण करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात आला. या संस्थेचे लोकहितार्थ कार्याची दखल घेत या प्रस्तावास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर

 rajesh pande