
नाशिक, 08 सप्टेंबर, (हिं.स.)। सिंहस्थ कुंभमेळा आणि पर्यावरण संवर्धनात युवकांचा थेट सहभाग वाढवण्याच्या उद्देशाने उन्नत नाशिक अभियान' अंतर्गत 'मिशन ग्रीन मान्सून'चा ११ वा टप्पा आज बुधवारी (दि. ९) पार पडणार आहे. भोंसला सैनिकी महाविद्यालयात सकाळी १० वाजता होणाऱ्या या कुंभ युवा संवाद' कार्यक्रमात ५ हजार विद्यार्थ्यांना देशी वृक्षांचे वाटप केले जाणार असून, हजारो युवकांच्या साक्षीने 'नशामुक्त भारता'चा संकल्पही करण्यात येईल. अभिनेते चिन्मय उदगीरकर अभिनेत्री योगिता माळसे यांची विशेष उपस्थिती असणार आहे. दरम्यान आतापर्यंत ५५,२७५ देशी वृक्षांची लागवड व वाटप पूर्ण झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI