पाथरी तहसील कार्यालयात वारंवार वीजपुरवठा खंडित; प्रशासकीय कामकाज ठप्प
परभणी, ८ सप्टेंबर (हिं.स.) : पाथरी येथील तहसील कार्यालयात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने दैनंदिन प्रशासकीय कामकाजावर मोठा परिणाम होत आहे. वीज नसल्यामुळे संगणक, इंटरनेट, प्रिंटरसह विविध इलेक्ट्रॉनिक यंत्रणा बंद पडत असल्याने शासकीय कामांसाठी ये
पाथरी तहसीलमध्ये खंडीत वीजपुरवठ्याने कामकाज ढेपाळले


परभणी, ८ सप्टेंबर (हिं.स.) : पाथरी येथील तहसील कार्यालयात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने दैनंदिन प्रशासकीय कामकाजावर मोठा परिणाम होत आहे. वीज नसल्यामुळे संगणक, इंटरनेट, प्रिंटरसह विविध इलेक्ट्रॉनिक यंत्रणा बंद पडत असल्याने शासकीय कामांसाठी येणाऱ्या शेतकरी आणि ग्रामस्थांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पाथरी तहसील कार्यालयात महसूल विभागाशी संबंधित विविध कामांसाठी दररोज ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने नागरिक येतात. उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, महसूल नोंदी, फेरफार, जमिनीशी संबंधित कागदपत्रे, विविध शासकीय योजनांसाठी आवश्यक दाखले यासह अन्य प्रशासकीय कामांसाठी नागरिकांना तहसील कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात.

मात्र, कार्यालयीन वेळेत वीजपुरवठा खंडित झाल्यास संगणक व इंटरनेट सेवा बंद पडतात. तसेच प्रिंटर आणि अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणेही कार्यरत राहत नसल्याने कर्मचाऱ्यांना कामकाज करणे अडचणीचे होते. परिणामी नागरिकांची कामे रखडतात.

वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर अनेक नागरिकांना तासन्तास कार्यालयात प्रतीक्षा करावी लागते. विशेषतः दूरवरच्या ग्रामीण भागातून आलेल्या शेतकरी व ग्रामस्थांना काम न होताच परत जावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात असून, प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होत आहे.

वारंवार उद्भवणाऱ्या या समस्येमुळे तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही कामकाजात अडथळे येत आहेत. त्यामुळे वरिष्ठ महसूल अधिकारी तसेच महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन पाथरी तहसील कार्यालयाचा वीजपुरवठा नियमित व सुरळीत करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिक आणि तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून होत आहे.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande