
नवी दिल्ली, 08 सप्टेंबर (हिं.स.) |जपानने भारताविरुद्धच्या एकमेव टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी आपला संघ जाहीर केला आहे. केंडल काडोवाकी-फ्लेमिंगच्या नेतृत्वाखालील १५ सदस्यीय संघाची निवड करण्यात आली आहे. हा संघ जवळपास तोच आहे जो २०२६ च्या आशियाई खेळांसाठी निवडण्यात आला होता. भारत आणि जपान यांच्यातील टी-२० सामना २२ सप्टेंबर रोजी सानो येथे होणार आहे. आयची-नागोया येथे होणाऱ्या २०२६ च्या आशियाई खेळांच्या अगदी आधी, दोन्ही संघांमधील हा पहिला आंतरराष्ट्रीय सामना असेल.
भारताविरुद्धच्या १५ सदस्यीय संघात त्या १२ क्रिकेटपटूंचा समावेश आहे, ज्यांची घोषणा जूनमध्ये २०२६ च्या हंगामासाठी करण्यात आली होती. तीन क्रिकेटपटू अ' संघातील आहेत. त्सुयोशी ताकाडा, जेक कुसुदा-नेर्न आणि ऍलास्टेयर काडोवाकी-फ्लेमिंग. भारत आणि जपान यांच्यातील या टी-२० सामन्याला सुझुकी कप असे नाव देण्यात आले आहे.
या सामन्यात भारतीय संघ श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळेल. आशियाई खेळांसाठी प्रवास करणारा संघ हाच असेल, ज्याची घोषणा आधीच झाली आहे. भारत आणि जपान यांच्यातील सामना सानो आंतरराष्ट्रीय मैदानावर होईल, जिथे २०२६ च्या सुरुवातीला टी-२० विश्वचषकासाठी पूर्व आशिया-पॅसिफिक पात्रता सामने आयोजित करण्यात आले होते. या मैदानाची क्षमता ५०० वरून २००० पर्यंत वाढवली जात आहे.
भारताविरुद्धच्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी जपानचा संघ:
केंडल काडोवाकी-फ्लेमिंग, चार्ली हारा-हिन्झ, बेंजामिन गो-इतो डेव्हिस, कोहेई कुबोटा, वातारू मियाउची, रिओ साकुरानो-थॉमस, डेक्लन सुझुकी-मॅककॉम्ब, शोमा सुगाया-स्लेटर, अलेक्झांडर शिराई-पॅटमोर, लॅकलन यामामोटो-लेक, माकोटो तानियामा, इब्राहिम ताकाहाशी, त्सुयोशी ताकाडा, जेक कुसुदा-नेर्न, ऍलास्टेयर काडोवाकी-फ्लेमिंग.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे