तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने फेक अकाउंट; धागेदोरे आता जळगाव जिल्ह्यापर्यंत
जळगाव, 08 सप्टेंबर (हिं.स.)तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या नावाचा वापर करून सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करण्यात आल्याच्या कथित प्रकरणाचे धागेदोरे आता जळगाव जिल्ह्यापर्यंत आहेत. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी चेन्नई वेस्ट झोन सायबर
तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने फेक अकाउंट; धागेदोरे आता जळगाव जिल्ह्यापर्यंत


जळगाव, 08 सप्टेंबर (हिं.स.)तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या नावाचा वापर करून सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करण्यात आल्याच्या कथित प्रकरणाचे धागेदोरे आता जळगाव जिल्ह्यापर्यंत आहेत. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी चेन्नई वेस्ट झोन सायबर क्राईम पोलिसांचे पथक नशिराबाद पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे. यावेळी येथील होमगार्ड मोहम्मद जुनेद शेख कुतुबुद्दीन याची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे नशिराबाद परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वी तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने किंवा त्यांच्या ओळखीचा आभास निर्माण करणारे हुबेहूब सोशल मीडिया अकाउंट तयार करण्यात आले होते. या अकाउंटवरून कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार केलेले बनावट व्हिडिओ, डिजिटल छायाचित्रे आणि विविध पोस्ट मोठ्या प्रमाणावर प्रसारित करण्यात आल्या होत्या. या डिजिटल कंटेंटच्या निर्मिती आणि प्रसारणामागे नेमके कोण आहे? याचा शोध घेण्यासाठी चेन्नई सायबर क्राईम पोलीस तांत्रिक तपासाच्या आधारे जळगावच्या नशिराबादपर्यंत पोहोचले आहेत.तपासाचा एक भाग म्हणून सायबर पोलिसांनी संबंधित सोशल मीडिया अकाउंट्सचे आयपी (आयपी) लॉग, लिंक्ड अकाउंट्स, ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक, सबस्क्रायबर तपशील आणि वापरण्यात आलेली डिजिटल उपकरणे यांची तांत्रिक पडताळणी सुरू केली आहे. हे बनावट अकाउंट नेमके कोणत्या ठिकाणाहून आणि कोणत्या उपकरणावरून ऑपरेट केले गेले, याबाबत पोलीस सखोल माहिती गोळा करत आहेतनशिराबाद पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या चेन्नईच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने होमगार्ड मोहम्मद जुनेद शेख याची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. या संपूर्ण प्रकरणात त्याचा नेमका सहभाग काय आहे किंवा त्याच्या उपकरणांचा वापर झाला का, याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande