जळगाव : तुरीच्या शेतात ‘गांजा’ ची लागवड; पोलिसांच्या छाप्यात १७५ झाडे जप्त
जळगाव, 08 सप्टेंबर, (हिं.स.) चोपडा तालुक्यातील अडावद पोलिस ठाण्याच्या हद्दीत तुरीच्या पिकामध्ये गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. देवझिरी गावातील शेतशिवारात पोलिसांनी छापा टाकून गांजाची तब्बल १७५ झाडे जप्त केली. या कारवाईत देवसिंह बरेल
जळगाव : तुरीच्या शेतात ‘गांजा’ ची लागवड; पोलिसांच्या छाप्यात १७५ झाडे जप्त


जळगाव, 08 सप्टेंबर, (हिं.स.) चोपडा तालुक्यातील अडावद पोलिस ठाण्याच्या हद्दीत तुरीच्या पिकामध्ये गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. देवझिरी गावातील शेतशिवारात पोलिसांनी छापा टाकून गांजाची तब्बल १७५ झाडे जप्त केली. या कारवाईत देवसिंह बरेला याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे., देवझिरी गावातील शेतशिवारात गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार डीवायएसपी सुनील पाटील आणि अडावद पोलिस ठाण्याचे प्रभारी एपीआय प्रशांत कंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने संबंधित ठिकाणी आज ८ सप्टेंबर रोजी कारवाई केली. पोलिसांनी शेताची पाहणी केली असता तुरीच्या पिकामध्ये गांजाची झाडे लावण्यात आल्याचे आढळून आले.

कारवाईदरम्यान गांजाची एकूण १७५ झाडे जप्त करण्यात आली. या प्रकरणात देवसिंह बरेला याला ताब्यात घेण्यात आले असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. विशेष म्हणजे, गांजाची लागवड करण्यात आलेले हे शेत मध्य प्रदेशाच्या सीमेलगतच्या परिसरात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या भागात अंमली पदार्थांच्या लागवडीविरोधात पोलिसांनी अधिक सतर्कता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. या कारवाईमुळे परिसरात गांजाची अवैध लागवड करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, या प्रकरणामागे आणखी कोणी सहभागी आहे का, याचा पोलिस तपास करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande