भारतीय हॉकी संघ आशियाई क्रीडा स्पर्धेत निळ्या जर्सीमध्ये खेळणार
नवी दिल्ली, 08 सप्टेंबर (हिं.स.) । जपानमध्ये होणाऱ्या २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी हॉकी इंडिया पुन्हा निळ्या जर्सीचा वापर करणार आहे. या निर्णयानंतर, भारतीय पुरुष आणि महिला संघांनी नेदरलँड्स आणि बेल्जियममध्ये खेळल्या गेलेल्या प्रो लीग सामन्या
भारतीय हॉकी संघ


नवी दिल्ली, 08 सप्टेंबर (हिं.स.) । जपानमध्ये होणाऱ्या २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी हॉकी इंडिया पुन्हा निळ्या जर्सीचा वापर करणार आहे. या निर्णयानंतर, भारतीय पुरुष आणि महिला संघांनी नेदरलँड्स आणि बेल्जियममध्ये खेळल्या गेलेल्या प्रो लीग सामन्यांमध्ये भगव्या रंगाची जर्सी मुख्य किट म्हणून परिधान केली होती. याच जर्सीला आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीही मंजुरी देण्यात आली आहे. हॉकी इंडियाने स्पष्ट केले की, २७ जुलै रोजी घेतलेला हा निर्णय पूर्णपणे तांत्रिक कारणांवर आधारित होता, जेणेकरून हॉकीपटूंच्या जर्सीचा रंग निळ्या टर्फशी विसंगत दिसणार नाही आणि मैदानावर त्यांची ओळख अधिक स्पष्ट होईल.

जर्सीच्या रंगातील बदलामुळे यापूर्वीही वाद निर्माण झाला होता. त्यावेळी, हॉकी इंडियाने स्पष्ट केले होते की, हा निर्णय राजकीय किंवा इतर कोणत्याही कारणास्तव नव्हे, तर तांत्रिक आधारावर, खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसोबत सविस्तर चर्चा केल्यानंतर घेण्यात आला होता. फेडरेशनच्या मते, निळ्या रंगाच्या सिंथेटिक खेळपट्ट्या आता आंतरराष्ट्रीय स्तरावर मानक बनल्या आहेत आणि निळ्या जर्सी अनेकदा टर्फमध्ये मिसळून जात असल्याने खेळाडूंच्या दृश्यमानतेवर परिणाम होत होता.

हॉकी इंडियाने सांगितले की, प्रशिक्षण कर्मचारी आणि हॉकीपटूंनी पिवळा आणि केशरी यांसारखे पर्यायी रंग सुचवले होते. सर्व बाबींचा विचार करून केशरी रंगावर एकमत झाले. फेडरेशनने असेही सांगितले की, तांत्रिक आवश्यकता पूर्ण करण्याव्यतिरिक्त, केशरी रंगाला विशेष महत्त्व आहे, कारण तो भारतीय तिरंग्याचा एक भाग असून शौर्य, त्याग आणि राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक मानला जातो.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande