
सिंगापूर, 09 सप्टेंबर (हिं.स.)।सिंगापूर सरकारने पंतप्रधान, उपपंतप्रधान आणि कॅबिनेट मंत्र्यांच्या पगारात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांचा वार्षिक पगार 2.2 दशलक्ष सिंगापूर डॉलरवरून वाढून 3.6 दशलक्ष सिंगापूर डॉलर होणार आहे. उच्च वेतनामुळे अधिक सक्षम आणि प्रतिभावान व्यक्तींना राजकारणात येण्यासाठी आकर्षित करता येईल तसेच प्रभावी प्रशासन सुनिश्चित करता येईल, असा सरकारचा युक्तिवाद आहे.
मात्र, हा निर्णय राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानला जात आहे. कारण सिंगापूरच्या नेत्यांचे उत्पन्न सामान्य नागरिकांच्या कमाईच्या तुलनेत अनेक पटींनी अधिक आहे. वोंग यांनी सांगितले आहे की, आपल्या कार्यकाळात पगारात झालेली संपूर्ण वाढ ते चांगल्या कार्यांसाठी दान करणार आहेत.
या श्रीमंत शहर-देशाने आपल्या राजकीय नेत्यांना दिल्या जाणाऱ्या उच्च पगाराचे समर्थन केले आहे. यामुळे योग्य आणि प्रतिभावान व्यक्तींना राजकारणात येण्यासाठी आकर्षित करता येते आणि देशात चांगले प्रशासन सुनिश्चित करता येते, असे सरकारचे म्हणणे आहे. मात्र, कॅबिनेट सदस्यांचे उत्पन्न सामान्य नागरिकांच्या तुलनेत अनेक पटींनी अधिक असल्याने हा मुद्दा राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहे.
वोंग यांनी सांगितले की, नव्या बदलानंतर त्यांचा वार्षिक पगार 2.2 दशलक्ष सिंगापूर डॉलर (1.7 दशलक्ष अमेरिकन डॉलर) वरून 3.6 दशलक्ष सिंगापूर डॉलर होईल. म्हणजेच त्यांच्या वार्षिक पगारात सुमारे 1.4 दशलक्ष सिंगापूर डॉलरची वाढ होणार आहे. भारतीय चलनानुसार त्यांचा नवीन वार्षिक पगार सुमारे 27 कोटी रुपये इतका असेल.उपपंतप्रधानांचा वार्षिक पगार 1.87 दशलक्ष सिंगापूर डॉलरवरून वाढून 3.06 दशलक्ष सिंगापूर डॉलर होणार आहे. तर कॅबिनेट मंत्र्यांना त्यांची वरिष्ठता आणि त्यांच्या खात्याचे महत्त्व यानुसार दरवर्षी 1.80 दशलक्ष ते 2.88 दशलक्ष सिंगापूर डॉलरपर्यंत पगार मिळणार आहे. वोंग यांनी सांगितले की, आपल्या कार्यकाळात पगारात झालेल्या या संपूर्ण वाढीची रक्कम ‘चांगल्या कार्यांसाठी’ दान करण्याची त्यांची योजना आहे.
पगारवाढ होण्यापूर्वीही सिंगापूरच्या पंतप्रधानांचा पगार अमेरिका आणि G7 देशांसह अनेक देशांच्या नेत्यांच्या तुलनेत खूपच अधिक होता. सध्याचे वेतन आणि अलीकडील विनिमय दर विचारात घेतल्यास, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दरवर्षी सुमारे 3.4 कोटी रुपये (4 लाख अमेरिकन डॉलर), चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना सुमारे 20 लाख रुपये (सुमारे 1.5 लाख युआन), रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना सुमारे 3 कोटी रुपये (सुमारे 3 कोटी रूबल), ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांना सुमारे 3.4 कोटी रुपये (सुमारे 60.7 लाख ऑस्ट्रेलियन डॉलर), जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांना सुमारे 2.3 कोटी रुपये (सुमारे 4,000 लाख येन) आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुमारे 24 लाख रुपये वार्षिक वेतन मिळते.या आकडेवारीत संबंधित देशांच्या वेतनरचनेनुसार आणि मिळणाऱ्या भत्त्यांनुसार काही फरक असू शकतो. तसेच भारतीय रुपयातील रक्कम विनिमय दरानुसार बदलत राहते.
पगाराच्या मुद्द्यावर वोंग यांनी म्हटले, “राजकीय नेत्यांचे वेतन हा एक कठीण आणि भावनिक मुद्दा आहे.”त्यांच्या ‘पीपल्स ॲक्शन पार्टी’ या पक्षाची सिंगापूरमध्ये दीर्घकाळापासून सत्ता आहे. सिंगापूरच्या संसदेसह 21 सदस्यांच्या कॅबिनेटवरही या पक्षाचे वर्चस्व कायम आहे. वोंग यांनी म्हटले, “यामध्ये असलेली रक्कम बहुतांश नागरिकांच्या कमाईपेक्षा कितीतरी अधिक आहे. त्यामुळे सिंगापूरचे नागरिक या मुद्द्यावर इतक्या बारकाईने लक्ष का ठेवतात आणि अनेक लोकांची याबाबत ठाम मते का आहेत, हे मला समजते.”
दक्षिण-पूर्व आशियाई देश असलेल्या सिंगापूरमध्ये तब्बल 15 वर्षांनंतर मंत्र्यांच्या पगारात बदल करण्यात येत आहे. सिंगापूरची गणना सातत्याने जगातील सर्वात कमी भ्रष्टाचार असलेल्या देशांमध्ये केली जाते.वोंग यांनी सांगितले की, पगारवाढीची शिफारस एका स्वतंत्र समितीने केली होती. मात्र, सध्या पदावर असलेल्या नेत्यांना तातडीने नव्या वेतनश्रेणीवर आणले जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.15 ऑक्टोबरपासून त्यांना त्यांच्या कामगिरीसह वैयक्तिक परिस्थितीनुसार कमाल 9 टक्क्यांपर्यंत एकरकमी वेतन समायोजन मिळेल. वोंग यांनी म्हटले, “यानंतर होणारा कोणताही बदल हा वैयक्तिक कामगिरी आणि जबाबदाऱ्यांच्या आधारे केला जाईल.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode