पोळा सणावर महागाईचे आणि मंदीचे सावट
मनमाडला पावसाची दडी आणि कोरडा दुष्काळ मनमाड, 09 सप्टेंबर (हिं.स.)। :- गेल्या महिन्याभरापासून पावसाने मारलेल्या दडीमुळे मनमाडसह संपूर्ण जिल्ह्यात भीषण दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. आज होत असलेल्या थेट फटका यंदाच्या बैलपोळा सणाला बसल
Inflation and recession loom


मनमाडला पावसाची दडी आणि कोरडा दुष्काळ

मनमाड, 09 सप्टेंबर (हिं.स.)।

:- गेल्या महिन्याभरापासून पावसाने मारलेल्या दडीमुळे मनमाडसह संपूर्ण जिल्ह्यात भीषण दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. आज होत असलेल्या थेट फटका यंदाच्या बैलपोळा सणाला बसला आहे. मनमाडचा मोठा आठवडे बाजार असूनही, पोळ्याच्या साहित्यासाठी बाजारात अपेक्षित गर्दी पाहायला मिळाली नाही. यामुळे व्यापारी आणि सामान विक्रेते चांगलेच अडचणीत सापडले आहेत.गेल्या वर्षी चांगल्या पावसामुळे बळीराजा सुखावला होता आणि सणासुदीला बाजारात चैतन्य होते. मात्र, यंदा पावसाअभावी परिस्थिती पूर्णपणे उलट आहे. पिके करपून गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. बैलपोळा हा शेतकऱ्यांचा सर्वात मोठा आणि आत्मीयतेचा सण. आपल्या लाडक्या बैलांना सजवण्यासाठी आणि पुजण्यासाठी शेतकरी वर्षभर उत्सुक असतात. मात्र, पाऊसच नसल्याने आणि चारा-पाण्याचे संकट गडद झाल्याने शेतकऱ्यांच्या मनावर चिंतेचे ढग आहेत. 'सण कसा साजरा करायचा?' हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे, ज्याचा परिणाम बाजारपेठेवर झाला आहे.

मनमाडच्या आठवडे बाजारात एरवी पोळ्याच्या आधीच्या रविवारी बैल सजावटीचे साहित्य, घुंगरू, वेसण, कासरे, गेरू आणि नवीन दोऱ्यांनी दुकाने ओसंडून वाहत असतात. ग्राहकही मोठ्या संख्येने खरेदीसाठी येतात. यंदा मात्र चित्र वेगळे होते. दुकाने तर सजली होती, पण ग्राहक गायब होते. 'सेव्हन स्टार' नावाच्या दुकानाच्या मालकांनी सांगितले की, आम्ही दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो रुपयांचे पोळा साहित्य भरले होते. मात्र, आज दिवसभरात मोजकेच शेतकरी आले. दुष्काळामुळे शेतकरी खरेदीला घाबरत आहेत. आमचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती आहे. इतर विक्रेत्यांनीही हीच व्यथा मांडली. बाजारात फक्त पोळ्याचेच नाही, तर इतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीवरही परिणाम झाल्याचे दिसून आले.

बाजारात आलेल्या एका शेतकऱ्याने सांगितले, गेल्या महिन्यात पाऊसच नाही. पिके वाळली आहेत. घरात खायला अन्न नाही आणि जनावरं कशी जगवायची, याची चिंता आहे. अशात पोळ्याचा आनंद साजरा करणे कठीण आहे. घरची परिस्थिती पाहता, यंदा सण साधेपणानेच साजरा करावा लागणार आहे. अनेक शेतकऱ्यांनी यंदा नवीन साहित्य खरेदी न करता, जुनेच साहित्य वापरण्याचे ठरवले आहे. काही शेतकऱ्यांनी तर जनावरे विकण्याचीही भीती व्यक्त केली आहे, पावसाच्या अभावामुळे केवळ शेतीच नाही, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही मोठा धक्का बसला आहे. प्रशासनाने या दुष्काळी परिस्थितीची तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी आणि बाजारातील मंदी दूर करण्यासाठी काही उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. येत्या काही दिवसांत पाऊस न पडल्यास, दुष्काळाची तीव्रता अधिक वाढून शेतकऱ्यांचे आणि व्यापाऱ्यांचे हाल होण्याची भीती आहे. पोळा सण हा शेतकऱ्यांच्या संघर्षाचे आणि आशेचे प्रतीक असतो, मात्र यंदा तो दुष्काळाच्या सावटाखाली साजरा होत आहे, हे नक्की.

संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सज्ज रहावे

- तालुक्यातील टंचाईग्रस्त परिस्थिती आणि प्रशासकीय पातळीवरील उदासीनता ह्याबाबतचा मागील काही वर्षातील अनुभव पाहता पैसेवारीच्या आकडेवारीत शेतकऱ्यांच्या नुकसानीचे वास्तव झाकले जाऊ नये यासाठी प्रशासनाने बांधावर जाऊन वस्तुनिष्ठ पाहणी करावी.अल निनोच्या प्रभावाने पावसाचे घटलेले सरासरी प्रमाण यामुळे तालुक्यावर दुष्काळाचे सावट गडद झाले असून,सप्टेंबर अखेर (१५ सप्टेंबर) जाहीर होणाऱ्या खरीप पिकांच्या 'नजर पैसेवारी'कडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसातील प्रदीर्घ खंडामुळे सोयाबीन,कापूस,तूर,मका यांसारखी महत्त्वाची पिके करपण्याच्या मार्गावर आहेत राज्य सरकारने याकडे लक्ष द्यावे. - महेंद्र बोरसे तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande