सायानी गुप्ताचा “आसमानी” चित्रपट फिल्म फेस्टिवल मध्ये ठरतोय अव्वल
मुंबई, 09 सप्टेंबर (हिं.स.)। सायानी गुप्ताचा दिग्दर्शकीय पदार्पण असलेला “आसमानी” चित्रपट जगभर नाव कमवत असून अनेक बड्या फिल्म फेस्टिवल मध्ये त्याच कौतुक होताना दिसतंय. आसमानी हा चित्रपट तिचा लेखिका/दिग्दर्शिका म्हणून असलेला पहिला वहिला चित्रपट आहे.
Aasmani


मुंबई, 09 सप्टेंबर (हिं.स.)। सायानी गुप्ताचा दिग्दर्शकीय पदार्पण असलेला “आसमानी” चित्रपट जगभर नाव कमवत असून अनेक बड्या फिल्म फेस्टिवल मध्ये त्याच कौतुक होताना दिसतंय. आसमानी हा चित्रपट तिचा लेखिका/दिग्दर्शिका म्हणून असलेला पहिला वहिला चित्रपट आहे. दोन महिन्यांत अमेरिका, कॅनडा, जपान आणि भारतातील दहा महोत्सवांमध्ये या चित्रपटाची निवड झाली आहे.

Washington DC South Asian Film Festival, Tokyo International Short Film Festival, India International Film Festival of Boston, Chicago South Asian Film Festival, Atlanta International Film Festival, इत्यादी शहरात तर भारतात परतल्यावर आसमानी बंगलोर इंटरनॅशन शॉर्ट फिल्म फेस्टिवल मध्ये India competition मध्ये सहभागी झाला आहे.

चित्रपटाच्या स्क्रीनिंग सोबतीने आसमानीने आधीच 59th World Fest Houston येथे REMI Special Jury Best Children/Family film आणि Inde Meme Film Festival Austin US येथे Best Short Film Audience choice award; Cannes Film Festival of the world येथे Best Children/Family film आणि इतर अनेक पुरस्कार जिंकले आहेत.

एका उत्साही आजी-नातीच्या जोडीची आणि त्यांच्या पॉवर ब्लू कारची प्रेम, विरह आणि मैत्रीची कथा असलेला आसमानी आहे. विविध संस्कृती आणि देशांमधील स्क्रीनिंग रूम्स मध्ये प्रेक्षकांच मन जिंकून घेणारी कथा ठरत आहे.

कॅमेऱ्यामागील तिच्या पहिल्या प्रयत्नासह, सायानीया फेस्टिव्हलच्या आवडत्या पदार्पण शॉर्टसह जगभर प्रवास करणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande