रत्नागिरी : करसल्लागार असोसिएशन, सीए ब्रॅंचच्या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन
रत्नागिरी, 4 फेब्रुवारी, (हिं. स.) : रत्नागिरी जिल्हा करसल्लागार असोसिएशन आणि सीए इन्स्टिट्यूटच्या र
रत्नागिरी : करसल्लागार असोसिएशन, सीए ब्रॅंचच्या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन


रत्नागिरी, 4 फेब्रुवारी, (हिं. स.) : रत्नागिरी जिल्हा करसल्लागार असोसिएशन आणि सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे आयोजित क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय खो- खोपटू अपेक्षा सुतार हिच्या हस्ते करण्यात आले.

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या जवाहर क्रीडांगणावर या स्पर्धा सुरू झाल्या. यामध्ये क्रिकेट, बुद्धिबळ, कॅरम, बॅडमिंटन, टग ऑफ वॉर या सांघिक व वैयक्तिक क्रीडा स्पर्धांचा समावेश आहे. सुमारे दीडशे जणांनी यात भाग घेतला आहे. करोना महामारीमुळे दोन वर्षे या स्पर्धा होऊ शकल्या नव्हत्या. या स्पर्धेकरिता एंजल ब्रोकिंग रत्नागिरी शाखेचे सहकार्य लाभले आहे.

उद्घाटनप्रसंगी अपेक्षाचा सत्कार करसल्लागार असोसिएशनचे अध्यक्ष सीए वरद पंडित यांनी केला. त्यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. करसल्लागार असोसिएशन व सीए ब्रॅंचच्या सर्व कार्यक्रमात सहभागी व्हा, असे मनोगत व्यक्त केले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande