आंतरराष्ट्रीय सायकल पोलो स्पर्धेमध्ये सुवर्ण जिंकण्यासाठी भारतीय सशस्त्र दल वचनबद्ध
मुंबई, 21 मार्च (हिं.स.) भारतीय सशस्त्र दल सायकल पोलो फेडरेशन ऑफ इंडियाच्या (CPFI) सहकार्याने अशा
आंतरराष्ट्रीय सायकल पोलो स्पर्धेमध्ये सुवर्ण जिंकण्यासाठी भारतीय सशस्त्र दल वचनबद्ध


मुंबई, 21 मार्च (हिं.स.) भारतीय सशस्त्र दल सायकल पोलो फेडरेशन ऑफ इंडियाच्या (CPFI) सहकार्याने अशा प्रकारची पहिलीच राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करीत आहे ज्यामध्ये भारतातील सर्वोत्तम सायकल पोलो संघ सहभागी होतील. महाराष्ट्रातील अहमदनगर येथील एसीसीअँडएस (ACC&S) येथे भारतीय लष्कराचे आर्म्ड कॉर्प्स, भारतीय वायुसेना आणि प्रादेशिक सेना यांच्यात ही स्पर्धा होणार असून हा तीन दिवसीय कार्यक्रम खेळाडूंना त्यांचे सर्वोत्तम कौशल्य दाखवण्यासाठी आणि आगामी जागतिक सायकल पोलो चॅम्पियनशिपसाठी त्यांना तयार करण्यासाठी एक कसोटी मैदान होऊ शकेल. आर्म्ड फोर्सेस सायकल पोलो चषक २०२३ ही स्पर्धा तीन दिवसांच्या कालावधीत सात सामन्यांमध्ये या तीन संघांना एकमेकांमध्ये भिडलेले पाहिल. विजेता संघ १.५ लाखांच्या बक्षिसाच्या रकमेसह उडचलो आर्म्ड फोर्सेस सायकल पोलो चषक (udChalo udChalo Armed Forces Cycle Polo Trophy) घेऊन जाईल. जेडब्ल्यूओ (JWO) विष्णू एस, लेफ्ट्नंट पीयूष कुमार सिन्हा आणि सिपाही सनोफर यांसारख्या जगप्रसिद्ध सायकलपटूंच्या नेतृत्वाखालील संघ जागतिक पातळीवर सायकल पोलोमध्ये भारताचे भविष्य निश्चित करतील.

हा खेळ भारतातील सामान्य जनतेत वाढत आहे., तरीही सशस्त्र दलाकडून जुन्या राष्ट्रीय संघांनीच जास्तीत जास्त वेळा प्रतिनिधीत्व केले आहे. आपण सहभागी झालेल्या आठ सायकल पोलो विश्व चषक स्पर्धांमध्ये सहा सुवर्ण आणि दोन कांस्य पदके जिंकून भारत जागतिक क्रमवारीत आघाडीवर आहे. २०१९ मध्ये अर्जेंटिना येथे झालेली आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकल्यामुळे यंदाच्या वर्षी भारतीय सायकल पोलो संघ सायकल पोलो विश्व चषक चॅम्पियन टायटल साठी डिफेंडिंग संघ असेल.

‘खेलो इंडिया’ या शासनाच्या उपक्रमाला आणखी चालना देण्यासाठी या स्पर्धेचा उद्देश तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग वाढवणे आणि क्रीडा क्षेत्रात उत्कृष्टता मिळवणे हा आहे.

आर्म्ड फोर्सेस सायकल पोलो चषक २०२३ चे कार्यक्रम व्यवस्थापक लेफ्टनंट कर्नल श्री. भारत पन्नू म्हणाले, “आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार करण्याच्या बाबतीत भारतीय सशस्त्र दल नेहमीच आघाडीवर असते. आपल्या देशाच्या सायकल पोलो संघाने सायकल पोलो विश्व चषक स्पर्धेत ६ वेळा सुवर्णपदक मिळवून आपला अभिमान वाढवला आहे. या खेळाला योग्य मान्यता मिळण्याची हीच वेळ आहे आणि एक राष्ट्र म्हणून आम्ही आमच्या सशस्त्र दलांमध्ये हे जे खेळाडू घडवतो त्या अप्रतिम खेळाडूंच्या कौतुकासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एकत्र येऊ.”

सायकल पोलो फेडरेशन ऑफ इंडियाचे मुख्य अधिकारी श्री. के. के. सोनी म्हणाले, “सायकल पोलो हा एक अत्यंत गतिशील व प्रचंड उर्जेने भरलेला असा खेळ आहे ज्यामध्ये हॉर्स पोलोची चपळता आणि सायकलिंगचा वेग व तीव्रता यांचा मेळ आहे. हा एक रोमांचक खेळ असून शारीरिक दृष्ट्या ताकद व ऊर्जेची गरज असलेला खेळ आहे. ज्यासाठी कौशल्य, अचूकता आणि टीमवर्क आवश्यक आहे. अहमदनगरला पहिल्यांदाच हा अनोखा खेळ अनुभवायला मिळणार आहे. आम्ही आमच्या देशात खेळाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी पाठिंबा देण्याचा विचार करत आहोत आणि पुढच्या यशस्वी हंगामाची वाट पाहत आहोत. संघांच्या कर्णधारांना माझ्या शुभेच्छा.”

उडचलो (udChalo) हे एक अग्रगण्य कन्झ्युमर टेक प्रायव्हेट लिमिटेड आहे जे केवळ भारतीय लष्करी दलांना सेवा पुरवते आणि ते आर्म्ड फोर्सेस सायकल पोलो चषक २०२३ चे अधिकृत प्रायोजक आहेत. उडचलो (udChalo) सैनिकांचे जीवन सुलभ बनवण्याच्या आपल्या ध्येयासाठी समर्पित आहे. या भागीदारीच्या माध्यमातून कंपनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सायकल पोलो या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande