राष्ट्रीय शालेय जलतरण स्पर्धेसाठी नाशिकच्या चार खेळाडूंची निवड
नाशिक, 1 जून (हिं.स.) – मनपाच्या तरण तलावात सराव करणा-या चार खेळाडूंची शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी
राष्ट्रीय शालेय जलतरण स्पर्धेसाठी नाशिकच्या चार खेळाडूंची निवड


नाशिक, 1 जून (हिं.स.) – मनपाच्या तरण तलावात सराव करणा-या चार खेळाडूंची शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या खेळाडुचे मनपा मुख्यालयात खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

दिल्ली येथे ६ ते १२ जून दरम्यान होणा-या ६६ व्या राष्ट्रीय शालेय जलतरण क्रीडा स्पर्धेसाठी नाशिकच्या चार खेळाडूंची निवड झाली आहे. चारही खेळाडू मनपाच्या नाशिक रोड येथील राजमाता जिजाऊ तरण तलावात सराव करतात. २०१८ नंतर प्रथमच राष्ट्रीय शालेय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. निवड झालेल्या ओमकार ढेरींगे, मयांक धामणे, निलोत्पल भाबल, श्रावणी गडाख या चार खेळाडूंचा मनपा मुख्यालयात प्रशासन उपायुक्त मनोज घोडे-पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande