'खुपते तिथे गुप्ते'च्या पहिल्या भागात हजेरी लावणार कोण ?
मुंबई, 3 जून (हिं.स.) : झी मराठी नेहमीच आपल्या प्रेक्षकांना नवीन दर्जेदार कार्यक्रम देण्यासाठी सज्ज
खुपते तिथे गुप्ते


मुंबई, 3 जून (हिं.स.) : झी मराठी नेहमीच आपल्या प्रेक्षकांना नवीन दर्जेदार कार्यक्रम देण्यासाठी सज्ज असते. आता ही प्रेक्षकांना बसणार आहेत धक्क्यावर धक्के कारण 'खुपते तिथे गुप्ते'च्या मंचावर दिसणार आहेत महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. झी मराठीने नुकताच एक प्रोमो आपल्या पेजवर शेअर केलाय. त्यामध्ये मुख्यमंत्री बोलताना दिसतायत 'खुपते तिथे गुप्ते इथे प्रश्नांना धार आहे, पण मी पण तयार आहे'.

अजून एक भन्नाट गोष्ट म्हणजे जबरदस्त भारदस्त व्यक्तीचे होणार आहे ह्या मंचावर आगमन ज्यांचा आहे खूप बोलबाला, महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणजे महाराष्ट्राचे आवडते राजकीय नेते मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे. गुप्तेंच्या खोचक नी धारदार प्रश्नांना राज देतील तेवढीच धारदार उत्तरे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande