रायगड : मच्छिमार, अन्य अवागमन करण्याऱ्या बोटींसाठी प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी
रायगड, 18 ऑक्टोबर (हिं.स.)। भारत निवडणूक आयोगाने 15 ऑक्टोबर 2024 रोजीच्या प्रसिध्दी पत्रकान्वये महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आल्याने,
रायगड : मच्छिमार, अन्य अवागमन करण्याऱ्या बोटींसाठी प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी


रायगड, 18 ऑक्टोबर (हिं.स.)।

भारत निवडणूक आयोगाने 15 ऑक्टोबर 2024 रोजीच्या प्रसिध्दी पत्रकान्वये महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आल्याने, रायगड जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघांतील निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून, तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने समुद्र मार्गे दारु, पैसा, अंमली पदार्थ व मतदारांना प्रलोभण देण्यासाठी मुफ्त वस्तू (Free bees) यांचा वाहतूक होणार नाही यासाठी व कोणतेही गैरप्रकार टाळण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सागरी किनाऱ्यावरील मच्छिमार तसेच अन्य अवागमन करण्याऱ्या बोटींवर नियंत्रण ठेवण्याकरीता जिल्हाधिकारी किशन जावळे प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी केला आहे.

जिल्ह्यातील सागरी किनाऱ्यावर येणाऱ्या सर्व बोर्टीनी अधिसूचित केलेल्या ठिकाणीच सदर बोर्टीचे अवागमन करावे. सदर बोटींनी अधिसूचित केलेल्या ठिकाणा व्यतिरिक्त इतर ठिकाणी आपल्या बोटींचे अवागमन केल्यास, सदर बोट जप्त करुन, कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. विधानसभा निवडणूक कालावधीमध्ये सागरी सुरक्षा पोलीस दल यांनी आपली गस्त तीनपटीने वाढवावी. या कालावधीमध्ये संशयास्पद बोटी अथवा कृती आढळल्यास उचित कायदेशीर कारवाई करुन, अहवाल उलटटपाली सादर करावा. मत्स्यविभाग रायगड, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि तटरक्षक दल यांनी विधानसभा निवडणूक कालावधीमध्ये जिल्ह्यातील समुद्रातील आपली गस्त वाढवावी. या कालावधीमध्ये संशयास्पद बोटी अथवा कृती आढळल्यास उचित कायदेशीर कारवाई करुन, अहवाल उलटटपाली सादर करावा. जिल्ह्यातील समुद्र किनारा असणाऱ्या गावांच्या संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांनी त्यांचे स्तरावर विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने समुद्र किनारा विभागातील संबंधित तलाठी, बिट मार्शल, ग्रामसेवकआणि कोतवाल यांची सनियंत्रण समिती गठीत करुन, समुद्र किनाऱ्यावरील गावांमध्ये कोणताही गैरप्रकारहोणार नाही याची दक्षता घ्यावी व सदर कालावधीमध्ये संशयास्पद बोटी अथवा कृती आढळल्यास उचित कायदेशीर कारवाई करुन, अहवाल उलटटपाली सादर करावा.

हिंदुस्थान समाचार / मेघा माने


 rajesh pande