विधानसभा २०२४ : 'कुडाळ-मालवण'साठी प्रशासन सज्ज
निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळूशे यांनी दिली माहिती मतदारसंघात २७९ मतदान केंद्र पैकी १८ केंद्रात 'नो नेटवर्क' सिंधुदुर्ग, 18 ऑक्टोबर (हिं.स.)। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाच्या
पत्रकार परिषदेत देताना कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळूशे. बाजूला मालवण तहसीलदार वर्षा झालटे. 


निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळूशे यांनी दिली माहिती

मतदारसंघात २७९ मतदान केंद्र पैकी १८ केंद्रात 'नो नेटवर्क'

सिंधुदुर्ग, 18 ऑक्टोबर (हिं.स.)। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे यांनी दिली.त्या आज पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी यावेळी सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा मालवण तहसिलदार वर्षा झाल्टे उपस्थित होत्या. कुडाळ मालवण मध्ये २३३ ठिकाणी २७९ केंद्रे कार्यान्वित केली जाणार आहेत. त्या सर्व केंद्रामध्ये एकुण २ लाख १५ हजार ३१० मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. विशेष म्हणजे या मतदार संघात एकुण १८ केंद्रे ही नो नेटवर्क असलेली केंद्रे आहेत. त्याठिकाणी प्रशासनाच्या वतीने ‘स्पेशल रनर्स’ ठेवण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांनी दिली. भारत निवडणुक आयोगाने दि. १५ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या प्रसिध्दीपत्रकान्वये महाराष्ट्र राज्यातील विधानसभेच्या २८८ जागा करीता विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामध्ये २६९ कुडाळ विधानसभा मतदार संघात निवडणुकीची अधिसूचना दि. २२ ऑक्टोबर रोजी जाहीर झाली आहे. उमेदवारांना नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम तारीख दि. २९ ऑक्टोबर पर्यंत असून नामनिर्देशन पत्राची छाननी दि. ३० ऑक्टोबर रोजी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख दि. ४ नोव्हेंबर आहे. दि. २० नोव्हेंबर रोजी मतदान होत असून दि. २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून २३३ ठिकाणी २७९ केंद्रे कार्यान्वित केली जाणार आहेत. त्या सर्व केंद्रामध्ये एकुण २ लाख १५ हजार ३१० मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये पुरूष १ लाख ७ हजार १२१ तर स्त्री मतदारांची संख्या १ लाख ८ हजार १८८ अशी आहे. विशेष म्हणजे या मतदार संघात एकुण १८ केंद्रे ही नो नेटवर्क असलेली केंद्रे आहेत. त्याठिकाणी प्रशासनाच्या वतीने ‘स्पेशल रनर्स’ ठेवण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांनी दिली. कुडाळ येथील प्रांताधिकारी कार्यालयात शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत श्रीमती काळुशे बोलत होत्या. यावेळी सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा मालवण तहसिलदार वर्षा झाल्टे उपस्थित होत्या. यावेळी श्रीमती काळुशे म्हणाल्या की, कुडाळ विधानसभा निवडणुकीत ३.२८ टक्के नविन मतदारांची नोंदणी झालेली आहे. सैनिक मतदारांची संख्या १५४ असुन यामध्ये स्त्री ७ तर पुरूष १४७ मतदार आहेत. पिडब्ल्युडी मतदार ८०३ मतदार १८-१९ वयोगटातील मतदार ३ हजार९२०, जेष्ठ नागरीक ३ हजार २४६ मतदारांची नोंदणी आहे.

कुडाळ विधानसभा निवडणुकीसाठी एकुण ५१ झोनल अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. निवडणुक विषय कामकाजासाठी२९ पथके नेमण्यात आलेेली आहेत. या प्रत्येक पथकात १ नोडल, १ सहाय्यक नोडल, ८ ते १० कर्मचारी, ४ ते ५ शिपाई व कोतवाल यांचा सहभाग राहणार आहे. सर्व पथकांमध्ये मिळून ३५० ते ४०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या मतदार संघात एकुण मतदान केंद्रांवर २७९ केंद्राध्यक्ष, २७९ मतदान अधिकारी असे मिळून एकुण १२३६ ते १३०० अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले असल्याचे सांगितले. यावेळी श्रीमती काळुशे म्हणाल्या की, कुडाळ विधानसभा मतदार संघात सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून कुडाळ तहसिलदार विरसींग वसावे, मालवण तहसिलदार वर्षा झाल्टे व महसुल विभागाचे तहसिलदार शितल जाधव काम पाहणार आहेत. या मतदार संघात नेटवर्क नसलेली कुडाळ ९ व मालवण तालुक्यात ९ अशी १८केंद्रे आहेत. यामध्ये निरोम, कुडोपी, भाटीवाडी, पोईल, शिरवंडे, डिकवळ, चाफेखोल, महानवाडी, कोळंब, कुसगांव, किनळोस, नारूर, वसोली, चाफेली, पुळास, उपवडे व आंजिवडे या १८ गावांचा समावेश आहे. तरी सुध्दा पोलिस पाटील यांना ‘स्पेशल रनर्स’ म्हणून सज्ज ठेवण्यात आले आहे. प्रशासनाच्या वतीने मतदान वाढीसाठी जनजागृतीपर कार्यक्रम करण्यात आले त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. कुडाळ विधानसभा मतदार संघात विशेष अशी 4 मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. यामध्ये पर्दानशीन मतदान केंद्र २६२ पिंगुळी (अंगणवाडी- पिंगुळी गोंधयाळे), दिव्यांग कर्मचारी संचलित मतदान केंद्र क्र. १२२ बागवाडी (जि.प. प्रा. शाळा काळसे बागवाडी), महिला कर्मचारी व्यवस्थापन करण्यात येणारे मतदान केंद्रे - केंद्र क्र. २६० बिबवणे ( जि.प. पुर्ण प्रा. शाळा बिबवणे क्र. १), युवा कर्मचारी व्यवस्थापन करणारे मतदान केंद्र - केंद्र क्र. १०३ मालवण नगरपंचायत ( रघुनाथ देसाई विद्यालय मालवण सभागृह) असल्याचे श्रीमती काळुशे यांनी यावेळी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / निलेश जोशी


 rajesh pande