भाजपच्या त्रिकूटाची मॅराथॉन मिटींग
गडकरी, फडणवीस, बावनकुळेंची 2 तास चर्चा नागपूर, 19 ऑक्टोबर (हिं.स.) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर होण्यापूर्वी आज, शनिवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद
गडकरींशी चर्चा करताना फडणवीस आणि बावनकुळे


गडकरी, फडणवीस, बावनकुळेंची 2 तास चर्चा

नागपूर, 19 ऑक्टोबर (हिं.स.) : महाराष्ट्र

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर होण्यापूर्वी आज, शनिवारी केंद्रीय

मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर

बावनकुळे यांनी गडकरींच्या निवासस्थानी मिटींग झाली. यावेळीया तिन्ही नेत्यांनी विदर्भातील राजकीय घडामोडींवर तब्बल 2 तास चर्चा केली.

भाजपमधील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या

चर्चेत विदर्भातील जागा वाटपासह उमेदवारांच्या नावांवर गडकरींची सहमती घेण्याचे

प्रयत्न झाले. विदर्भातील बहुतांश जागांवर गडकरींचा प्रभाव आहे. तसेच गडकरींना

मानणारा वर्गही मोठा आहे. त्यामुळे येथील जागांसह उमेदवारांबाबत गडकरींचे मत काय

आहे, हे जाणून घेण्यासाठी फडणवीस व बावनकुळे यांनी अंतिम चर्चा केली.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अमित शहांच्या सूचनेवरून मध्यप्रदेशातील भाजप नेते

कैलाश विजयवर्गी विदर्भातील उमेदवार निवड आणि जागा वाटपाचे नियोजन करीत आहेत.

त्यामुळे यापूर्वी स्थानिक ज्येष्ठ नेत्यांचा दिसणारा प्रभाव यंदा फार कमी

जाणवतोय. याचा परिणाम निवडणुकीवर होऊ नये म्हणून पक्षाकडून दक्षता घेतली जातेय.

फडणवीस आणि बावनकुळेंची गडकरींशी चर्चा सुरू

असतानाच विदर्भातील संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर देखील गडकरींच्या निवासस्थानी

पोहचले. याप्रसंगी गडकरींनी उपस्थित नेत्यांना काही महत्त्वाच्या सूचना केल्याची

माहिती सूत्रांनी दिली.

रामटेकमध्ये आमदार आशिष जयस्वाल हे महायुतीचे उमेदवार असतील, अशी घोषणा केल्यानंतर भाजपाचे माजी आमदार डी. मल्लिकार्जून रेड्डी

यांनी बंड पुकारले. त्यामुळे भाजपाने रेड्डी यांना निलंबित केले. या कारवाईमुळे

नाराज झालेल्या भाजपा पदाधिकाऱ्यांनी मेळावा घेत सामूहिक राजीनामे दिले. या सर्व

नाराज पदाधिकाऱ्यांना शनिवारी रात्री देवगिरी बंगल्यावर बोलावण्यात आले. उपमुख्य देवेंद्र

फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची समजूत काढली व महायुतीला

साथ देण्याची सूचना केली. एकंदर गडकरींना विदर्भातील परिस्थितीची कल्पना दिल्यानंतर त्यांच्याकडून मिळालेल्या सूचनेनुसार पक्षात संभाव्य डिझास्टर मॅनेजमेंटचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

----------------------------------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande