रत्नागिरी, 2 ऑक्टोबर, (हिं. स.) : डेरवण (ता. चिपळूण) येथे झालेल्या जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत बसण येथील जी. एम. शेट्ये हायस्कूलने सुयश मिळविले. विशेष बाब म्हणजे स्पर्धेतील सहाच्या सहा खेळाडूंची विभाग स्तरावर निवड झाली.
कंपाउंड प्रकारात १४ वर्षे मुलांच्या गटात रिषभ मांडवकर याने द्वितीय क्रमांक मिळविला. १४ वर्षे मुलींच्या गटात फिटा प्रकारात श्रावणी गावडे हिने प्रथम क्रमांक मिळविला. १७ वर्षे मुले गटात कंपाउंड प्रकारात मंथन घुमे याने प्रथम क्रमांक प्राप्त केला. १७ वर्षे मुलींच्या फिटा प्रकारात मुक्ता लोंढे हिने प्रथम क्रमांक मिळवला. मुले १९ वर्षे वयोगटात कंपाउंड प्रकारात मंथन नेवरेकर याने प्रथम क्रमांक प्राप्त केला, तर मुलींच्या फिटा प्रकारात श्रेयश्री लोंढे हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला. या सर्वांची कोल्हापूर येथील विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / बाळकृष्ण कोनकर