महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्ष पदी विठ्ठल राठोड
मुंबई, 2 ऑक्टोबर (हिं.स.) महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्ष पदी श्री.विठ्ठल राठोड यांची शासनाने नियुक्ती केली आहे. त्यांनी पदाचा पदभार स्वीकारला. याप्रसंगी दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्नशील
Mumbai


मुंबई, 2 ऑक्टोबर (हिं.स.) महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्ष पदी श्री.विठ्ठल राठोड यांची शासनाने नियुक्ती केली आहे. त्यांनी पदाचा पदभार स्वीकारला. याप्रसंगी दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्नशील राहणार असून आंतरराष्ट्रीय स्तरावरील निर्मितीसंस्था महामंडळाच्या जागेवर चित्रीकरणासाठी आनंदाने येतील अशा प्रकारच्या सोई-सुविधा येथे उपलब्ध करण्यावर आगामी काळात भर देणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

दरम्यान महामंडळाच्या बैठक हॉलमध्ये सह व्यवस्थापकीय संचालक डॉ.धनंजय सावळकर यांनी त्यांचे स्वागत करून अभिनंदन केले. यावेळी महामंडळाचे आजी-माजी अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. तसेच श्री. राठोड यांचे कुटुंबिय-नातेवाईक, मित्र परिवारही यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होता.

पुढे संवाद साधतांना श्री. राठोड म्हणाले की, येथील अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळे सध्या हे महामंडळ नफ्यात काम करत आहे. त्यामुळे महामंडळाच्या कर्मचारीवर्गाचे प्रलंबित असणारे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे. बदलत्या काळाबरोबर चित्रनगरीचा पुनर्विकास होणे गरजेचा असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जागतिक दर्जाची चित्रनगरी निर्माण होणे महत्वाचे आहे. त्यासाठी येथे चित्रीकरण संख्या वाढवून उत्पन्नात वाढ करण्याची गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी महामंडळातील अधिकारी- कर्मचारी यांनी देखील यथोचित भावना व्यक्त केल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande