रत्नागिरी : मराठी विषय शिक्षकांचा डिसेंबरमध्ये स्नेहमेळावा
रत्नागिरी, 22 ऑक्टोबर, (हिं. स.) : जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील मराठी विषय शिक्षकांचा मेळावा येत्या डिसेंबर महिन्यात घेण्यात येणार आहे. कनिष्ठ महाविद्यालय मराठी विषय शिक्षक महासंघाची सर्वसाधारण सभा चिपळूण येथील नवकोकण एज्युकेशन सोसायटीच्या ड
रत्नागिरी : मराठी विषय शिक्षकांचा डिसेंबरमध्ये स्नेहमेळावा


रत्नागिरी, 22 ऑक्टोबर, (हिं. स.) : जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील मराठी विषय शिक्षकांचा मेळावा येत्या डिसेंबर महिन्यात घेण्यात येणार आहे.

कनिष्ठ महाविद्यालय मराठी विषय शिक्षक महासंघाची सर्वसाधारण सभा चिपळूण येथील नवकोकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे महाविद्यालयात झाली. त्यामध्ये याबाबतचा निर्णय झाला.

या सभेसाठी जिल्हा कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी आणि तालुका प्रतिनिधी उपस्थित होते. याप्रसंगी माजी सल्लागार प्रा. गिरीराज पां/डे यांचा सन्मान करण्यात आला. राज्य शासनाचा १३ सप्टेंबरचा अकरावी व बारावीसाठीमराठी विषय अनिवार्य केल्याचा अधिनियम आणि ३ ऑक्टोबर रोजी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दिलेला दर्जा याबद्दल अभिनंदनचा ठराव करण्यात आला.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रा. विठ्ठल केंद्रे, सहसचिव प्रा. वसंत भुसारे, सहखजिनदार प्रा. क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त केले. तालुकास्तरावर कार्यकारिणी स्थापन करण्यासाठी प्रत्येक मराठी विषय शिक्षकाने प्रयत्न करण्याची सूचना यावेळी दिली गेली. मराठी विषय शिक्षकांना एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात स्नेहमेळावा घेण्याचे ठरविण्यात आले.

हिंदुस्थान समाचार / बाळकृष्ण कोनकर


 rajesh pande