राज्यस्तरीय मूल्यमापनासाठी संगमेश्वरमधील पुस्तकाची निवड
रत्नागिरी, 22 ऑक्टोबर, (हिं. स.) : करजुवे (ता. संगमेश्वर) येथील माध्यमिक विद्यालयातील रामराव बनसोडे यांच्या महापुरुषांची प्रेरणादायी चरित्रे या पुस्तकाची राज्यस्तरीय मूल्यमापनासाठी निवड झाली. बनसोडे यांचा त्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य
राज्यस्तरीय मूल्यमापनासाठी संगमेश्वरमधील पुस्तकाची निवड


रत्नागिरी, 22 ऑक्टोबर, (हिं. स.) : करजुवे (ता. संगमेश्वर) येथील माध्यमिक विद्यालयातील रामराव बनसोडे यांच्या महापुरुषांची प्रेरणादायी चरित्रे या पुस्तकाची राज्यस्तरीय मूल्यमापनासाठी निवड झाली.

बनसोडे यांचा त्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य शशिकांत नलावडे, माजी पंचायत समिती सभापती सुभाष नलावडे, खेर्डी औद्योगिक वसाहतीचे उपअभियंता विजय धामापूरकर, संचालक शामसुंदर माने यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, समग्र शिक्षा ग्रंथालय यांनी घेतलेल्या जिल्हास्तर स्पर्धेतून त्यांच्या पुस्तकाची राज्यस्तरीय मूल्यमापनासाठी निवड झाली आहे. याबद्दल संचालिका प्रिया नलावडे, संचालक अनंत केळकर, रमेश धामापूरकर, राजेश खोपकर, कीर्ती सागवेकर, मुख्याध्यापक अशोक कुवळेकर यांनी अभिनंदन केले.

हिंदुस्थान समाचार / बाळकृष्ण कोनकर


 rajesh pande