एफडीएचा पंचवटीतील तेल ट्रेडिंग दुकानावर छापा; हजारो रुपयाचा माल जप्त 
नाशिक, 26 ऑक्टोबर (हिं.स.)। अन्न व औषध प्रशासन विभागाने लागोपाठ दुसऱ्या दिवशी देखील आपली छापेमारी सुरूच ठेवली असून पंचवटीतील एका ट्रेडिंग कंपनी वरती छापा मारून हजारो रुपयांचे भेसळयुक्त तेल जप्त केले आहे. यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. उत्सवात गोडी
एफडीएचा पंचवटीतील तेल ट्रेडिंग दुकानावर छापा; हजारो रुपयाचा माल जप्त 


नाशिक, 26 ऑक्टोबर (हिं.स.)।

अन्न व औषध प्रशासन विभागाने लागोपाठ दुसऱ्या दिवशी देखील आपली छापेमारी सुरूच ठेवली असून पंचवटीतील एका ट्रेडिंग कंपनी वरती छापा मारून हजारो रुपयांचे भेसळयुक्त तेल जप्त केले आहे. यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.

उत्सवात गोडी आणणाऱ्या विविध प्रकारच्या मिठाईनी शहरातील दुकाने सज्ज झाली आहेत. विविध प्रकारची, चविष्ट आणि आकर्षक मिठाई घेण्यासाठी नागरिकांची देखील दुकानांमध्ये झुंबड उडत आहे. याची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने देखील खवा, मावा, तुप, तेल व मिठाईच्या शुध्दतेवर करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. कुठल्याही प्रकारे आरोग्यास हानीकारक ठरेल अशी पदार्थ विकली जाऊ नये याकरिता एफडीएकडून आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे.कायदाच नियमानुसार निर्गमित करण्यात आलेल्या परवाना अटींचे उल्लंघन होता कामा नये, अन्नविषबाधासारखा अनुचित प्रकार घडणार नाही. त्यासाठी काय करावे आदी बाबत उत्पादकांना सूचना देण्यात आल्या होत्या.

तरी, देखील सणासुदीचा फायदा घेऊन विक्री होत असल्याचे उदाहरण समोर येत आहे. दोन दिवसापूर्वीच अन्न व औषध प्रशासन विभागाने सातपूर आणि इंदिरानगर येथील मिठाई विक्रेत्या दुकानांवर छापे टाकले होते त्यानंतर लागोपाठ दुसऱ्या दिवशी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने छापा टाकण्यात आला असून पंचवटीतील मे श्री आदिनाथ ट्रेडिंग कंपनी वरती छापा टाकून या पिढीमध्ये असलेले तेलाची तपासणी केली असता जुन्या डब्यात रिफाइंड सोयाबीन तेल सुमारे 388 kg साठा जप्त करण्यात आला आहे. त्याची किंमत 64 हजार 747 रुपये असून हा साठा जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई अन्नसुरक्षा अधिकारी गोपाल कासार अमित रासकर डीडी तांबोळी सहाय्यक आयुक्त म.ना. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले असून काही तक्रार असल्यास ती करण्याबाबतचा अहवाल करण्यात आलेला आहे.

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI


 rajesh pande