भंडारा : गौशाळेत चालतो अवैध बाजार
भंडारा, 3 ऑक्टोबर (हिं.स.)। गौशाळेच्या नावाखाली भंडारा जिल्ह्यात अवैध जनावरांची तस्करी केली जाते. मात्र, या तस्करीकडे पोलिसांचा दुर्लक्ष असल्याचा निदर्शनात येत आहे. राज्य सरकारकडून आता देशी गायीला ‘राज्यमाता-गोमाता’ घोषित करण्याचा निर्णय कॅबिनेटच्य
Goshala


भंडारा, 3 ऑक्टोबर (हिं.स.)। गौशाळेच्या नावाखाली भंडारा जिल्ह्यात अवैध जनावरांची तस्करी केली जाते. मात्र, या तस्करीकडे पोलिसांचा दुर्लक्ष असल्याचा निदर्शनात येत आहे.

राज्य सरकारकडून आता देशी गायीला ‘राज्यमाता-गोमाता’ घोषित करण्याचा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यासंबंधीचा शासकीय अध्यादेश नुकताच जारी करण्यात आला आहे. तरी भंडारा जिल्ह्यात गौतस्करी थांबताना थांबत नाही त्यामुळे जिल्ह्यातील गौ - शाळेच्या नावाखाली अवैध धंदे चालतात. याकडे कोणाचेही लक्ष नसल्याने गौशाळा चालक आपली मनमर्जी मुक्या जनावरांची विक्री करत असतात. भंडारा तालुक्यातील मालेगाव येथील भगीरथा गौशाळा आहे. या गौशाळेत पोलिसांनी कारवाई केलेल्या हजारो बैल, गाई पाठवण्यात आले. मात्र, गौशाळा चालक काही जनावरे ही अवैद्यरित्या कत्तलीकरिता विकत असल्याचा वास्तव समोर येत आहे. या संदर्भात भगीरता गौशाळेच्या अध्यक्षांना विचारणा केली असता त्यांनी दैनंदिन रजिस्टर दाखविला नाही. त्यामुळे या गौशाळेत आजपर्यंत हजारो जनावरे आली. मात्र, प्रत्यक्षात दोनशे तीनशे जनावरे या गौशाळेत हजर आहे. इतर जनावरे मृत्यूमुखी पावले असल्याच्या गौशाळा चालक सांगत आहे. पण या जनावरांना खड्डा खोदून जिथे पुरण्यात आला त्यांची छायाचित्रे काढणे अनिवार्य आहे. पण या गौशाळा चालकाकडे कुठलीही छायाचित्र उपलब्ध नाही. तसेच दैनंदिन रजिस्टर सुद्धा नसल्याचा निदर्शनात आला आहे. त्यामुळे भागीरथी गौशाळेत काहीतरी अलबेल असल्याचे चित्र दिसून येत आहे. या विषयी अध्यक्षांची बाजू घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी कॅमेऱ्यासमोर नकार दिला आहे. ह्या गौ शाळा चालक जनावरे मृत झाल्यावर त्यांना गावाच्या शेजारी बेवारपणे फेकून देतो याचा त्रास गावकऱ्यांना शाळकरी मुलांना होतो. या संदर्भात गावकऱ्यांनी अनेक तक्रारी दिली आहेत. मात्र, पोलिसांनी अद्यापही कुठली कारवाई केली नसल्याचा आरोप गावातील नागरिकांनी केला आहे.

एकिकडे देशात गौमाता वाचली पाहिजे अशी संकल्पना सरकार करतोय त्याकरिता गौशाळा चालकांना लाखो रुपयांचा अनुदान दिला जातो. मात्र, या गौशाळेच्या माध्यमातून जनावरांचा व्यापार केला जात असल्याचा धक्कादाय प्रकार समोर येत आहे. त्यामुळे शासनाने प्रत्येक गौशाळेचा ऑडिट करण्याची गरज आहे.

हिंदुस्थान समाचार / Pravin Tandekar


 rajesh pande