भाजपचे पराग शहा राज्यात सर्वात श्रीमंत उमेदवार; २,१८७ कोटींची संपत्ती
मुंबई ३० ऑक्टोबर (हिं.स.): महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी निवडणुकांचा रंग चढू लागला आहे, आणि या निवडणुकीच्या अर्ज प्रक्रियेत उमेदवारांच्या संपत्तीची माहिती देखील समोर येत आहे. भाजपचे पराग शहा हे या निवडणुकीत सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहे
पराग शाह


मुंबई ३० ऑक्टोबर (हिं.स.):

महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी निवडणुकांचा रंग चढू लागला आहे, आणि या निवडणुकीच्या अर्ज प्रक्रियेत उमेदवारांच्या संपत्तीची माहिती देखील समोर येत आहे. भाजपचे पराग शहा हे या निवडणुकीत सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. घाटकोपर पूर्व मतदारसंघातून उमेदवारी करणाऱ्या शहांची संपत्ती पाच वर्षांत दहापट वाढून तब्बल २,१८७ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

पराग शहांच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे २,१७८ कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांच्या पत्नीच्या नावावर १,१३६ कोटींची संपत्ती आहे. या संपत्तीचा मोठा भाग शेअर्स व अन्य गुंतवणुकीत आहे. पराग शहांच्या नावावर ३१ कोटींची स्थावर मालमत्ता असून त्यांच्या पत्नीच्या नावावर ३४.१७ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. दोघांवर मिळून ३७.९० लाख रुपयांचे कर्ज देखील आहे.

२०१९ साली पराग शहांची संपत्ती २३९ कोटी रुपये होती आणि पत्नीची १६० कोटी रुपये. आता मात्र त्यात दहापट वाढ झाली आहे. शहांच्या कौटुंबिक मालमत्तेतही मोठी वाढ झाली असून, त्यांनी निवडणूक प्रक्रियेत आर्थिक ताकद दाखवली आहे.

पराग शहांनंतर भाजपचेच अन्य श्रीमंत उमेदवार म्हणजे सध्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा. मलबार हिल मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे लोढा यांनी ४३६ कोटींच्या संपत्तीची नोंद केली आहे. त्यांच्या संपत्तीत १२३ कोटींची जंगम मालमत्ता आणि १२५ कोटींची स्थावर मालमत्ता आहे. मात्र त्यांच्यावर १८२ कोटी रुपयांचे कर्ज देखील आहे. २०१९ च्या तुलनेत लोढांच्या संपत्तीत घट झाली आहे. त्यावेळी ती ४४१ कोटी रुपये होती.

हिंदुस्थान समाचार / Shuddhodana Mangorao


 rajesh pande