गडचिरोली : छाननीत  65 पैकी 52 अर्ज वैध, 13 झाले बाद
गडचिरोली., 30 ऑक्टोबर (हिं.स.)।गडचिरोली जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघात आज नामनिर्देशनपत्रांची छाननी संबंधीत निवडणुक निरीक्षक व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत पूर्ण करण्यात आली. यात कालपर्यंत दाखल करण्यात आलेल्या एकूण 65 नामनिर्देशन
गडचिरोली : छाननीत  65 पैकी 52 अर्ज वैध, 13 झाले बाद


गडचिरोली., 30 ऑक्टोबर (हिं.स.)।गडचिरोली जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघात आज नामनिर्देशनपत्रांची छाननी संबंधीत निवडणुक निरीक्षक व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत पूर्ण करण्यात आली. यात कालपर्यंत दाखल करण्यात आलेल्या एकूण 65 नामनिर्देशन अर्जापैकी 52 अर्ज वैध ठरले तर 13 अर्ज अवैध ठरले.

आरमोरी विधानसभा निवडणुकीसाठी 14 उमेदवारांनी दाखल केलेल्या 20 अर्जापैकी 12 उमेदवारांचे 18 नामनिर्देशनपत्र वैध ठरले. दामोधर तुकराम पेंदाम व निलेश छगनलाल कोडापे यांचे नामनिर्देशन अवैध ठरले. गडचिरोली विधानसभा निवडणुकीसाठी 14 उमेदवारांनी दाखल केलेल्या 22 अर्जापैकी 14 उमेदवारांचे 19 अर्ज वैध ठरले. 3 अर्ज अवैध ठरले मात्र त्यांचे एकापेक्षा अधिक दाखले केलेले अर्ज वैध ठरल्याने उमेदवारांची संख्या कमी झाली नाही. अहेरी विधानसभा मतदार संघासाठी 16 उमेदवारांनी दाखल 23 अर्जापैकी 14 उमेदवारांचे 15 अर्ज वैध ठरले. आत्राम तनुश्री धर्मरावबाबा व पोरतेट ऋषी बोंदय्या या दोन उमेदवारांचे अर्ज बाद झाले. एबी फॉर्म विहित नमुन्यात सादर न केल्याने तसेच नामनिर्देशन पत्रावर दहा सूचकांच्या स्वाक्षऱ्या नसल्याने उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवले गेले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Milind Khond


 rajesh pande