पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कासारवडवली हद्दीत वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी
ठाणे, 4 ऑक्टोबर (हिं.स.)। कासारवडवली वाहतूक उपविभागाच्या हद्दीत दि.०५ ऑक्टोबर २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कासारवडवली, घोडबंदर रोड, ठाणे येथे दौरा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास महत्वाच्या व अतिमहत्वाच्या व्यक्ती तसेच मोठ्या संख्येन
पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कासारवडवली हद्दीत वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी


ठाणे, 4 ऑक्टोबर (हिं.स.)। कासारवडवली वाहतूक उपविभागाच्या हद्दीत दि.०५ ऑक्टोबर २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कासारवडवली, घोडबंदर रोड, ठाणे येथे दौरा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास महत्वाच्या व अतिमहत्वाच्या व्यक्ती तसेच मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाच्या दरम्यान ठाणे ते घोडबंदर वाहिनी सर्व्हिस रोड, डीमार्ट ते टायटन हॉस्पिटल, घोडबंदर ठाणे वाहिनी सर्व्हिस रोड, ओवळा ते वाघबीळ नाकापर्यंत वाहने पार्क करण्यास मनाई व एक दिशा मार्ग करण्यात आला आहे. या परिसरात वाहतूक कोंडी होवू नये, वाहतूक सुरळीत होण्याकरिता ठाणे शहर वाहतूक विभाग पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी मनाई आदेश जारी केला आहे.

*ठाणे घोडबंदर वाहिनी :-*

प्रवेश बंद :- १) टायटन हॉस्पिटल कडून डीमार्ट कडे सर्व्हिस रोडने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना टायटन हॉस्पिटल येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग :- ही वाहने टायटन हॉस्पिटल कडून डीमार्ट कडे जाण्यासाठी ओवळा सिग्नल येथून मुख्य रस्त्याने कासारवडवली, आनंदनगर, वाघबीळ ब्रिजखालून इच्छित स्थळी जातील.

*घोडबंदर ठाणे वाहिनी :-*

प्रवेश बंद :- १) वाघबीळ नाका कडून ओवळा कडे सर्व्हिस रोडने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना वाघबीळ नाका, सिग्नल येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग :- अ) ही वाहने वाघबीळ नाका कडून आनंदनगर व कासारवडवली कडे जाण्यासाठी टीजेएसबी बँक चौक, चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क मार्गे इच्छित स्थळी जातील. ब) ही वाहने वाघबीळ नाका कडून ओवळा कडे जाण्यासाठी वाघबीळ ब्रिजखालून मुख्य रस्त्याने इच्छित स्थळी जातील.

*नो पार्किंग झोन :-*

१) टायटन हॉस्पिटल ते डीमार्ट सर्व्हिस रोड नो पार्किंग झोन घोषित करण्यात येत आहे.

२) वाघबीळ नाका ते आनंदनगर नाका नो पार्किंग झोन घोषित करण्यात येत आहे.

ही वाहतूक अधिसूचना दि.४ ऑक्टोबर २०२४ रोजी पासून सुरु होवून कार्यक्रम संपेपर्यंत अंमलात राहील. ही वाहतूक नियंत्रण अधिसूचना पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडोर, ऑक्सिजन गॅस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही, असे ठाणे शहर वाहतूक विभाग पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande