महाराष्ट्रात हिंदुत्ववादी शक्तीमुळे एनडीएची बाजू मजबूत
महाराष्ट्र विधानसभा निकालाचा दिवस (23 नोव्हेंबर 2024) हा हिंदू समाजासाठी अंतर्गत परिवर्तनाचा दिवस ठरला आहे, कारण भाजप आणि मित्रपक्षांनी संकटात सापडलेल्या परिस्थितीत महाराष्ट्रात दणदणीत विजय मिळवला. हिंदू समाजाच्या जागृतीने केवळ या निवडणुकीसाठीच नव्हे
महायुती


महाराष्ट्र विधानसभा निकालाचा दिवस (23 नोव्हेंबर 2024) हा हिंदू समाजासाठी अंतर्गत परिवर्तनाचा दिवस ठरला आहे, कारण भाजप आणि मित्रपक्षांनी संकटात सापडलेल्या परिस्थितीत महाराष्ट्रात दणदणीत विजय मिळवला. हिंदू समाजाच्या जागृतीने केवळ या निवडणुकीसाठीच नव्हे, तर भविष्यातील निवडणुकांसाठी आणि सनातन तत्त्वे लक्षात घेऊन राजकीय पक्ष विकासासाठी कसे कार्य करू शकतात याची व्याख्या केली आहे. अकल्पनीय स्ट्राइक रेटने भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या अभूतपूर्व यशात कोणत्या घटकांचा हातभार लागला? बघूया...

आयडिया ऑफ इंडिया आणि भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारांच्या विरोधात डीप स्टेट शक्तींचे खोटे विमर्श, तसेच राहुल गांधी आणि इंडी आघाडीला डीप स्टेट शक्तींचा भक्कम पाठिंबा, यामुळे हिंदू मतदारांचे विभाजन त्यामुळे लोकसभेत मोठा फटका बसला होता. जात, संविधान आणि आरक्षणाच्या आधारावर त्यांच्यात मोठी फूट निर्माण झाली होती. पंतप्रधान मोदींनी पुन्हा केंद्रात सरकार स्थापन केले, पण यावेळी स्वबळावर बहुमत न मिळवता. खोट्या कथनांचा फायदा घेऊन डाव्या उदारमतवादी शक्तींनी आणि हिंदुत्वविरोधी राजकीय शक्तींनी सनातन धर्म आणि मोदी सरकारवर भयंकर वैचारिक हल्ला चढवला. हे हिंदुत्वाला अधिक मारक असल्याचे सिद्ध झाले आहे, परंतु रा. स्व. संघ, वीहिप सारख्या हिंदुत्ववादी शक्ती, हिंदू धार्मिक आणि अध्यात्मिक संत आणि त्यांच्या संघटना हिंदुत्वासाठी हिंदूंना एकत्र करण्यासाठी एकत्र आल्या आहेत.

हिंदुत्ववादी शक्ती जमिनीस्तरावर कसा बदलावं आणत आहेत.

संघ, विश्व हिंदू परिषद आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांच्या मदतीने धार्मिक आणि अध्यात्मिक गुरूंनी एकत्र येऊन वक्फ बोर्ड कायदा, लव्ह जिहाद, शरिया कायदा, व्होट जिहाद, मदरसा द्वेषयुक्त शिक्षण आणि त्याचा निधी, हिंदूंचे धार्मिक धर्मांतर आणि त्याचे घातक परिणाम यांच्या धोक्यांबद्दल जागरुकता वाढवली. त्यांनी हिंदूंच्या मोठ्या मेळाव्याला संबोधित करून एकजुटीने हिंदूंनी संविधानाला विध्वंसक शक्तींपासून कसे वाचवता येईल यासाठी मानसिकता तयार करण्यास सुरुवात केली. या प्रबोधनाने हिंदू समाजात मोठी सकारात्मक लाट निर्माण झाली आणि एकता किती महत्त्वाची आहे हे त्यांनी ओळखले, त्यामुळेच २०१९ आणि सध्याच्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मतांची टक्केवारी वाढली.

विशेष घोषणांचा निवडणुकीवर प्रभाव

पीएम मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांच्या “एक है तो सेफ है” आणि “बटेंगे तो कटेंगे” या घोषणांनी हिंदूंमध्ये प्रचंड जागरण निर्माण केले. श्रेष्ठत्व आणि कनिष्ठतेच्या मर्यादित जातीय वृत्ती तुटल्या आहेत आणि हिंदू आता एकजुटीने मतदान करत आहेत. मुस्लिम नेते सज्जाद नोमानी आणि इतर मौलवी आणि मुस्लिम संघटनांनी मविआ ला मतदान करण्याचा फतवा जारी केल्याने हिंदू ऐक्य देखील वाढले आहे. धुळे, महाराष्ट्र लोकसभा जागेवरील वोट जिहादबाबत हिंदूंना समजले की, जर वोट जिहादच्या परिणामी महाराष्ट्र धर्म आणि सनातन धर्माच्या विरोधात मुस्लिमांच्या १७ मागण्या पूर्ण करणारे सरकार स्थापन झाले, तर ते संपूर्ण समाजासाठी किती घातक ठरेल. हिंदू समाजासाठी धोकादायक ठरेल. हिंदुत्ववादी शक्तींच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हिंदू एकता बळकट झाली आणि सर्व राजकीय पक्षांना, विशेषत: हिंदुत्वाला विरोध करणाऱ्या आणि शरियाचे समर्थन करणाऱ्यांना, हिंदूंना गृहीत धरले जाऊ शकत नाही आणि त्यांना द्वितीय श्रेणीचे नागरिक मानले जाऊ नये, असा मजबूत संकेतही दिला. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी आपल्या भाषणाने आणि रॅलीने जोरदार प्रभाव पाडला, विशेषत: लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारच्या विरोधात मतदान करणाऱ्या मराठवाड्यात.

खोट्या कथनांचा पर्दाफाश

समाजाच्या सर्व स्तरांतील बुद्धिजीवींच्या वैचारिक शक्तीचा उपयोग करून खोट्या विमर्षांचे निर्मूलन करणे आणि गावातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत अचूक माहिती किंवा खरा विमर्श पोचवणे खूप प्रभावी ठरले आहे. राहुल गांधी आणि इंडी आघाडीने मांडलेले प्रत्येक खोटे कथन तथ्ये आणि आकडेवारी वापरून पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे. राज्यघटना, आरक्षण, व्यापार, उद्योग, उद्योगपती, अर्थव्यवस्था, महाराष्ट्राचे गुजरातशी असलेले संबंध आणि शेतकऱ्यांच्या अडचणींशी संबंधित खोट्या कथनांचा मुकाबला सत्याने केला जात असल्याची जाणीवही लोकांमध्ये वाढली आहे.

लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षण घटकामुळे भाजपचे मोठे नुकसान झाले. मराठा आणि ओबीसी जातीच्या राजकारणामुळे भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचे खूप नुकसान झाले होते. कोण आपल्या बाजूने आहे आणि कोण विरोधात काम करत आहे याची वस्तुस्थिती मांडून मराठ्यांची मानसिकता बदलणे अवघड होते. तसेच ओबीसींच्या भावना जपणंही तितकंच महत्वाचं होत. सर्वांनी हिंदुत्वाच्या ध्वजाखाली एकत्र का व्हावे याविषयी तथ्ये आणि आकडेवारीसह जागरूकता पसरवत हे गुंतागुंतीचे काम हिंदुत्ववादी शक्तींनी सहजतेने पार पाडले. याचा फायदा भाजप आणि मित्रपक्षांना झाला आहे. मराठा आणि ओबीसी मतदारांनी जातीचे राजकारण बाजूला ठेवून महान आणि बलाढ्य महाराष्ट्राच्या बाजूने मोठ्या संख्येने मतदान केले.

विजयाकडे नेणारी धोरणे

राज्यातही भाजपचे सरकार असल्याने मध्यमवर्गीय, नवमध्यमवर्गीय, गरीब कुटुंबे, शेतकरी, मजूर यांच्यासाठी मोदी सरकारच्या विविध योजना यशस्वीपणे राबविण्यात आल्या. भाजपच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने भगिनींसाठी जाहीर केलेला सर्वात मोठा आणि सर्वात प्रभावी उपक्रम, “लाडकी बहीण योजना” ने भाजप आणि त्यांच्या युतीच्या भागीदारांच्या बाजूने एक मजबूत सकारात्मक लाट निर्माण केली आहे. भाजप आणि मित्रपक्षांना मतदान करण्यासाठी महिला मोठ्या संख्येने बाहेर पडल्या.

या विजयाचा केंद्र सरकारवर काय परिणाम होईल?

झारखंडमध्ये भाजपचा विजय झाला नसला तरी, हरियाणा आणि महाराष्ट्रातील विजयाने विरोधी पक्षांसह सर्वांची विचारसरणी पूर्णपणे बदलली आहे, ज्यांना वाटत होते की भाजपचे अधःपतन सुरू झाले आहे. केंद्र सरकार अधिक मजबूत होईल आणि राष्ट्रहितासाठी अधिक ठोस निर्णय घेईल. उलट इंडी आघाडी लवकरच तुटताना दिसेल! अस्थिरतेचा मुद्दाही मागे पडला आहे. वक्फ बोर्ड दुरुस्ती कायदा, यूसीसी आणि इतर महत्त्वाच्या विधेयकांचा संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये जोरदार पाठपुरावा केला जाईल. इतर पक्षांचाही पाठिंबा वाढेल. इंडी आघाडीतून पक्ष आता बाहेर पडायला सुरुवात होईल.

भविष्यातील निवडणुकांवर विशेषत: दिल्लीत होणाऱ्या निवडणुकीवर प्रभाव

महाराष्ट्राच्या निकालाने अरविंद केजरीवाल यांच्या तिसऱ्यांदा दिल्ली जिंकण्याच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. पुढील वर्षी होणाऱ्या दिल्लीच्या निवडणुका निःसंशयपणे हिंदुत्व शक्ती आणि हिंदू ऐक्याचा प्रभाव दिसून येईल. अशी एकजूट कायम राहिली आणि ती अधिक मजबूत झाली, तर पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू आणि तेलंगणा जिंकून या राज्यांचा सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विकास करणे सोपे होईल. प्रत्येक हिंदूने खंबीरपणे उभे राहून डीप स्टेट, राहुल गांधी आणि इतर विरोधी पक्षांकडून पसरवलेल्या खोट्या विमर्षांना विरोध करण्याची वेळ आली आहे. हिंदू ऐक्याचा या अद्भुत राष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विकासाच्या दृष्टीने फायदा होईल.

पंकज जगन्नाथ जयस्वाल

७८७५२१२१६१

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande