‘सीआयडी आणि 'आहट' आता सोनी मराठीवर
मुंबई, 7 नोव्हेंबर (हिं.स.)। टेलिव्हिजन वरील काही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करतात आणि त्यांच्या आयुष्याचा भाग देखील होतात. तशाच आजवर टेलिव्हिजन गाजलेल्या मालिका सोनी मराठी वाहिनी आपल्या भेटीस घेऊन येणार आहे. ‘सीआयडी’ आणि 'आहट' या दोन मालिका प्र
Cid


मुंबई, 7 नोव्हेंबर (हिं.स.)। टेलिव्हिजन वरील काही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करतात आणि त्यांच्या आयुष्याचा भाग देखील होतात. तशाच आजवर टेलिव्हिजन गाजलेल्या मालिका सोनी मराठी वाहिनी आपल्या भेटीस घेऊन येणार आहे. ‘सीआयडी’ आणि 'आहट' या दोन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आजवर या मालिका हिंदी भाषेत आपण पहिल्या पण आता या मालिका मराठीत पाहता येणार आहेत. ‘सीआयडी’ आणि 'आहट' या मालिकांचे विशेष असे काही भाग आपल्या मातृभाषा मराठी मध्ये पाहता येणार आहेत. हा थराराचा १ तास सोनी मराठीवाहिनीवर पाहता येईल. सत्याचा शोध घेण्यासाठी येत आहे ए.सी.पी. प्रद्युम्न आणि टीम! ‘सीआयडी’ मालिकेतून ९.३० वाजता आपल्या भेटीस येणार आहेत तर आता पसरणार सगळीकडे भीतीचे सावट कारण येत आहे 'आहट' १०.३० वाजता.

टेलिव्हिजनवरील सगळ्यात लोकप्रिय आणि आवडती क्राईम मालिका म्हणजेच सी आय डी (CID). आजवर टेलिव्हिजनवरील सगळ्यात जास्त काळ असलेली मालिका म्हणजेच सी आय डी. या मालिकेतील ऐसीपी प्रद्युमन, इन्स्पेक्टर दया आणि इन्स्पेक्टर अभिजीत अशी सगळीच पात्र सुपरहिट ठरली. संपूर्ण टीम मिळून घडलेल्या गुन्ह्या मागील सत्य शोधून काढायचे. या मालिकेने आजवर प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. आता हाच कार्यक्रम आणि हीच सुपरहिट पात्र मराठीतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हो CID मालिका सोनी मराठी वाहिनीवर आता मराठीतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांची आवडती पात्र आता मराठीतून दिसणार आहेत. तसेच आहट हि एक थ्रिल्लर, हॉरर टेलिव्हिजन मालिका आहे. जवळ जवळ २० वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्या काळातील सगळ्यात थरारक मालिका ठरली. हि मालिका आता मराठीतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सोनी मराठी वाहिनीवर हे विशेष असे भाग पाहायला मिळतील. त्यामुळे हे थरारक असे भाग मराठीतून पाहण्याची संधी प्रेक्षकांनी चुकवू नये.

पाहायला विसरू नका ७ नोव्हेंबर पासून ‘सीआयडी’ ९.३० वाजता आणि 'आहट' १०.३० वाजता मराठीतून आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande