पिंगा गं पोरी पिंगा 25 नोव्हेंबरपासून कलर्स मराठीवर
मुंबई, 7 नोव्हेंबर (हिं.स.)।प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या 'कलर्स मराठी' वाहिनीवर आता एक नवी खास गोष्ट येत आहे. ‘पिंगा गं पोरी पिंगा’ ही मालिका पाच मैत्रिणींच्या नात्यावर आधारित असून त्यांच्या जीवनातील प्रत्येक आनंदाच्या आणि कठीण प्रसंगात कशा प्
पिंगा गं पोरी पिंगा 25 नोव्हेंबरपासून कलर्स मराठीवर


मुंबई, 7 नोव्हेंबर (हिं.स.)।प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या 'कलर्स मराठी' वाहिनीवर आता एक नवी खास गोष्ट येत आहे. ‘पिंगा गं पोरी पिंगा’ ही मालिका पाच मैत्रिणींच्या नात्यावर आधारित असून त्यांच्या जीवनातील प्रत्येक आनंदाच्या आणि कठीण प्रसंगात कशा प्रकारे एकमेकींच्या पाठीशी उभ्या राहतात हे भावनिक पद्धतीने मांडण्यात आले आहे. ऐश्वर्या शेट्ये, विदिशा म्हसकर, शाश्वती पिंपळीकर, प्राजक्ता परब आणि आकांक्षा गाडे या अभिनेत्री या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.आता रसिकांना ही गोष्ट लवकरच पाहता येणार आहे. 'पिंगा ग पोरी पिंगा' २५ नोव्हेंबरपासून, रोज संध्याकाळी ७:३० वाजता. फक्त आपल्या 'कलर्स मराठी'वर आणि कधीही.

हिंदुस्थान समाचार / मेघा माने


 rajesh pande