खोट्या चर्चेविरोधात वैचारिक लढाईची गरज - गितेश चव्हाण
सोलापूर, 26 डिसेंबर (हिं.स.)। खोटे विचारविमर्श बनवून विद्यार्थ्यांसह भारतीयांची दिशाभूल करण्याचे काम अनेक वर्षांपासून सुरू आहे. अशा खोट्या चर्चेविरोधातील तरुण विद्यार्थ्यांची वैचारिक लढाई ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद
ABVP news fro today newss


सोलापूर, 26 डिसेंबर (हिं.स.)।

खोटे विचारविमर्श बनवून विद्यार्थ्यांसह भारतीयांची दिशाभूल करण्याचे काम अनेक वर्षांपासून सुरू आहे. अशा खोट्या चर्चेविरोधातील तरुण विद्यार्थ्यांची वैचारिक लढाई ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे क्षेत्रीय संघटनमंत्री गितेश चव्हाण यांनी केले.

हरिभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणात भरलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 59 व्या प्रदेश अधिवेशनाचा समारोप झाला. याप्रसंगी व्यासपीठावर अभाविपचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. शांतिनाथ बागेवाडी, प्रदेशमंत्री अथर्व कुलकर्णी होते.

चव्हाण म्हणाले, ज्ञानाचा दिवा पेटला की अज्ञान शिल्लक राहणार नाही. जीवनमूल्यांबद्दल आपण सजग असले पाहिजे. ज्यांच्या जीवन चरित्रातून जीवनमूल्यांचे प्रकटीकरण होते, अशा महापुरुषांची चरित्रे महाविद्यालय तरुण-तरुणींपर्यंत पोहोचवली पाहिजेत. सकारात्मक विमर्श प्रस्थापित करण्यात महाविद्यालय परिसराची भूमिका महत्त्वाची आहे, असेही क्षेत्रीय संघटनमंत्री चव्हाण यांनी सांगितले. अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी प्रदेश संघटनमंत्री मीत ठक्कर यांनीही विविध जिल्ह्यातून अधिवेशनासाठी उपस्थित राहिलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनी मार्गदर्शन केले. समारोपाच्या दिवशी जिल्हाश: बैठका, आगामी दिशा, व्यवस्था परिचय, घोषणा सत्र अशी अनेक सत्रे झाली. प्रदेश कार्यकारिणी बैठकीने अधिवेशनाचा समारोप झाला.

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande