'रंग माझा वेगळा' फेम अनघाचा आजीसोबत झिंगाट डान्स
मुंबई, 30 डिसेंबर (हिं.स.)।'रंग माझा वेगळा' मालिकेने काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला.या मालिकेतील व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. याच मालिकेतील अभिनेत्री अनघा भगरे हिने तिच्या आजीसोबत 'झिंगाट' गाण्यावर खास डान्स केला
रंग माझा वेगळा' फेम अनघा


मुंबई, 30 डिसेंबर (हिं.स.)।'रंग माझा वेगळा' मालिकेने काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला.या मालिकेतील व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. याच मालिकेतील अभिनेत्री अनघा भगरे हिने तिच्या आजीसोबत 'झिंगाट' गाण्यावर खास डान्स केला आहे. या डान्सचा व्हिडीओ अनघाने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा डान्सचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

'रंग माझा वेगळा' मालिकेतून अभिनेत्री अनघा भगरे हिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. अनघा सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. नुकताच अनघाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत अनघा नाचत असून तिच्या मागे लाउड स्पीकरवर 'झिंगाट' गाणं वाजताना दिसतंय. अनघा आजीसोबत थिरकताना दिसतेय. अनघाचा हा व्हिडीओ अल्पावधीत व्हायरल झाला असून तिच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनी पसंती दिली आहे. कडक, फॅब्यूलस अशा कमेंट करुन नेटकऱ्यांनी या व्हिडीओचं कौतुक केलं आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Avinash


 rajesh pande