राजापूरचे माजी आमदार गणपत कदम यांच्या मोटारीला अपघात
रत्नागिरी, 18 एप्रिल, (हिं. स.) : राजापूरचे माजी आमदार गणपत कदम यांच्या इनोव्हा मोटारीला महामार्गावर
राजापूरचे माजी आमदार गणपत कदम यांच्या मोटारीला अपघात


रत्नागिरी, 18 एप्रिल, (हिं. स.) : राजापूरचे माजी आमदार गणपत कदम यांच्या इनोव्हा मोटारीला महामार्गावर गाडगीळ वाडी येथे अपघात झाला.

महामार्गावर समोरून आलेल्या गुरांच्या कळपाने कदम यांच्या मोटारीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. चालकाच्या प्रसंगावधामुळे कदम यांना व चालकाला कोणतीही इजा झाली नाही. मात्र, कदम यांच्या गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

कदम मुंबईहून राजापुरातील आपल्या पन्हळे गावी येण्यासाठी निघाले होते. महामार्गावर राजापूरच्या गाडगीळवाडी येथे त्यांची गाडी आली असता महामार्गवर समोरून येणाऱ्या गुरांच्या एका कळपाने थेट कदम यांच्या गाडीलाच धडक दिली. चालक मनोज देवधर याने प्रसंगावधान दाखवत गाडी आवरल्याने मोठा अनर्थ टळला. गाडीच्या पुढील व उजव्या बाजूचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कदम सुखरूप असून त्यांना कोणतीही इजा झाली नसल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली.

या अपघातामुळे पुन्हा एकदा महामार्गावरील मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande