नाशकात जुन्या भांडणाची कुरापत काढून एकावर चाकूने हल्ला
नाशिक १८ एप्रिल, (हिं.स.) - जुन्या भांडणाची कुरापत काढुन पवन जाधव या तरुणाला तिघांनी चाकूने वार केल्
नाशकात जुन्या भांडणाची कुरापत काढून एकावर चाकूने हल्ला


नाशिक १८ एप्रिल, (हिं.स.) - जुन्या भांडणाची कुरापत काढुन पवन जाधव या तरुणाला तिघांनी चाकूने वार केल्याची घटना मनमाड शहरात घडली असून या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी तरुणाला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या घटनेतील आरोपी अनुज शिंदे, सचिन भिवसने, चेतन भिवसने या तिघा आरोपींविरुद्ध भादवी कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून यापैकी दोघा आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधीक्षक बाजीराव महाजन यांनी दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक घुगे हे करत आहेत.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande