भाग्यश्री मिलिंदची 'अनोखी' झेप, रंगभूमीवर पूर्ण करणार शंभरी
मुंबई, 18 एप्रिल (हिं.स.) 'आनंदी गोपाळ' द्वारे आपल्या अभिनयाची छाप उमटवल्यानंतर भाग्यश्री मिलिंद या
भाग्यश्री मिलिंदची 'अनोखी' झेप, रंगभूमीवर पूर्ण करणार शंभरी 


मुंबई, 18 एप्रिल (हिं.स.) 'आनंदी गोपाळ' द्वारे आपल्या अभिनयाची छाप उमटवल्यानंतर भाग्यश्री मिलिंद या नावाला एक विशिष्ट वलय प्राप्त झाले. भाग्यश्रीने त्यानंतर ओटीटी तसेच हिन्दीत देखील नशीब अजमावले. ज्यात देखील ती उजवी ठरली. मात्र भाग्यश्री इथेच थांबली नाही तर तिने गुजराती रंगभूमीवर देखील आपल्या अभिनयाची जादू चालवली आहे. 'अनन्या' या मराठी नाटकाचे रूपांतर असलेल्या 'एक छोकरी साव अनोखी' या गुजराती नाटकाच्या माध्यमातून भाग्यश्रीने गुजराती प्रेक्षकांना आपलेसे केले आहे.

मराठीमध्ये गाजलेल्या या नाटकाचे गुजराती रूपांतर देखील घवघवीत यश मिळवत असून, येत्या 20 एप्रिल रोजी या नाटकाचा शंभरावा प्रयोग होणार आहे. आतापर्यंतचे 99 प्रयोग यशस्वी केल्यानंतर या नाटकाचा 100 वा प्रयोग भाग्यश्री साठी मैलाचा दगड असून, भाषा कोणतीही असो यापुढे ही अभिनयाची पूजा करत राहणार असल्याचे, आणि माय बाप रसिक प्रेक्षकांच्या हृदयातील आपले स्थान अबाधित ठेवणार असल्याचा प्रयत्न मी करत राहणार असल्याचे भाग्यश्री ने सांगितले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande