विना परवाना वृक्षतोड करणा-याकडुन 18 लाखाचा दंड वसूल
सिडको, १९ एप्रिल, (हिं.स) :- पाथर्डी शिवार,वडनेर पाथर्डी रोड लगत असलेल्या प्लॉट नंबर १७/२/ बी/४ वरील
विना परवाना वृक्षतोड करणा-याकडुन 18 लाखाचा दंड वसूल


सिडको, १९ एप्रिल, (हिं.स) :- पाथर्डी शिवार,वडनेर पाथर्डी रोड लगत असलेल्या प्लॉट नंबर १७/२/ बी/४ वरील विनापरवाना तब्बल ४८ झाडे तोडणाऱ्या नागरिकावर मनपाच्या उद्यान विभागाने कारवाई करीत तब्बल १८ लाख १५ हजारांचा दंड वसूल केला आहे.

महापालिकेच्या सिडकोतील उद्यान विभागाने विनापरवाना झाडे तोडणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाईस सुरवात केली आहे. उद्यान विभागाचे उपायुक्त विवेक भदाणे, विभागीय अधिकारी सुनीता कुमावत, राजेंद्र सोनवणे व निरीक्षक प्रशांत परब यांनी ही कारवाई केली. या ठिकाणी ४८ झाडे तोडण्यात आली होती. याबाबत पर्यावरण प्रेमींकडून तक्रार येताच त्यावर कडक कारवाई करण्यात आली. बबना तायडे यांच्याकडून झाडे तोडल्याप्रकरणी १८ लाख ५० हजारांचा दंड वसूल करण्यात आल आहे. त्यांनी २९ फ्रेबुवारी रोज ही झाडे तोडली होती. मनपाच्य उद्यान विभागाचे आधिकारी प्रशांत परब यांनी ही माहिती दिली. कारवाईचे पर्यावरण प्रेमींनी स्वागत केले आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande