इगतपुरी - ३८ लाखांची बनावट देशी दारू जप्त
इगतपुरी, १९ एप्रिल, (हिं.स) - इगतपुरी तालुक्यातील तळेगाव शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथका
इगतपुरी - ३८ लाखांची बनावट देशी दारू जप्त


इगतपुरी, १९ एप्रिल, (हिं.स) - इगतपुरी तालुक्यातील तळेगाव शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ३७ लाख ९० हजार रुपयांची बनावट देशी दारू जप्त केली. एका ट्रकमधून देशी दारू रॉकेट संत्राची अवैधरीत्या वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी तळेगाव - शिवारात सापळा रचला होता.

एमएच ०४ केयू ५५५३ या क्रमांकाचा टाटा कंपनीचा ट्रक पथकाने थांबविला असता त्यांना गाडीबाबत शंका आल्याने त्यांनी गाडीची तपासणी केली. तेव्हा वाहनचालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पथकाचा संशय बळावला. त्यांनी वाहनाची तपासणी केली असता गाडीच्या मागील बाजूच्या दरवाजाला डिजिटल लॉक होते. हे लॉक वाहनचालकाच्या सहाय्याने उघडले. तेव्हा प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये सॅनिटरी नॅपकिनचे कव्हरिंग दिसून आले व त्या गोण्यांच्या मागे कागदी खोक्यांमध्ये ९० मिलिलिटर क्षमतेच्या देशी दारूच्या ५१० बॉक्समध्ये ठेवलेल्या ५१ हजार बाटल्या मिळून आल्या. राज्य उत्पादन शुल्क विभागाने वाहनचालक भगवानदास चिंतामणी बर्मा याला ताब्यात घेतले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande