अमरावती लोकसभा मतदान तारखेला लग्नं घाई, मतदानाची टक्केवारी कमी होण्याची शक्यता
अमरावती, 19 एप्रिल, (हिं.स.) अंजनगाव सुर्जी अमरावती लोकसभा निवडणुकीची दुसऱ्या टप्प्यांतील मतदानाची त
अमरावती लोकसभा मतदान तारखेला लग्नं घाई, मतदानाची टक्केवारी कमी होण्याची शक्यता


अमरावती, 19 एप्रिल, (हिं.स.) अंजनगाव सुर्जी अमरावती लोकसभा निवडणुकीची दुसऱ्या टप्प्यांतील मतदानाची तारीख जवळ जवळ येत असुन याच २६ एप्रिल ला लग्नाचे मुहूर्त असल्याने मतदानाची टक्केवारी कमी होण्याची शक्यता आहे.लोकसभा निवडणूकीची धामधूम सुरू झाल्यानंतर निवडणूक आयोगाकडून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे.

दुसरीकडे लोकसभा निवडणुकीच्या काळातच लग्नाचे मुहूर्त येत असल्याने नियोजित वधू वरांच्या कुटुंबीयांवर सुध्दा मतदानाचा हक्क बजावाला वेळ मिळणार की नाही याची शक्यता कमीच आहे.दरवर्षी एप्रिल मे महिन्यामध्ये लग्नाचे मुहूर्त अधिक असतात जुनमध्ये पावसाळा सुरू होतो. त्यानंतर शेतकऱ्यांना शेतीची कामे तर शाळा,काॅलेज सुरू होत असल्याने पालकांची धावपळ असते. त्यामुळे एप्रिल,मे महिन्यात अधिक लग्न असतात मात्र या वर्षी मे महिन्यात दोनच मुहूर्त असल्याने २६,२७, एप्रिल ला लग्नाच्या तारखांना मंगल कार्यालय,बॅण्ड आदींची बुकिंग फुल्ल झाली असल्याचे चित्र आहे. निवडणूक आयोगाने निवडणूकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच लग्नाचे मुहूर्त काढून वधू वर पित्यांनी मंगल कार्यालय आधीच बुक केली आहेत. दर पाच वर्षांनी लग्नसमारंभ आणि लोकसभा निवडणूका एकत्र येत असल्याचा फटका मतदान टक्केवारीवर बसत असल्याने निवडणूक आयोगाने या नंतर सुधारणा करण्याची गरज असल्याचे मतदार बोलत आहे. भारतातील लोकसभा निवडणुकांतील मतदानाच्या टक्केवारीवर दुष्टिक्षेप टाकला तर मतदानाच्या टक्केवारीचे चित्र कधीही समाधान कारक दिसून आले नाही. मतदानाची कमी टक्केवारी होण्याची अनेक कारणे असू शकतात.मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी भारतात सक्तीचे मतदान करावे अशी मागणी नागरिकांन मधुन होत आहे

टक्केवारीचा कोणावर होणार परिणाम

अमरावती लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी कमी झाल्यास काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून येतील असे जाणकारांचे मत असुन टक्केवारी जास्त प्रमाणात झाल्यास भाजप, किंवा प्रहार उमेदवार निवडून येतील असा अंदाज वर्तविण्यात येतो

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande