टीव्हीएस मोटर कंपनीने सात विभागांत जिंकले प्रतिष्ठित सन्मान
बेंगळुरू, 19 एप्रिल (हिं.स.) टीव्हीएस मोटर कंपनी (टीव्हीएसएम) या दुचाकी व तीन चाकी वाहन क्षेत्रातील
बेंगळुरू


बेंगळुरू, 19 एप्रिल (हिं.स.) टीव्हीएस मोटर कंपनी (टीव्हीएसएम) या दुचाकी व तीन चाकी वाहन क्षेत्रातील आघाडीच्या जागतिक उत्पादक कंपनीला जे. डी. पॉवर २०२४ इंडिया टु- व्हीलर इनिशियल क्वालिटी स्टडीमध्ये प्रतिष्ठित सन्मान मिळवल्याचे जाहीर करताना अभिमान वाटत आहे.

या सन्मानांमुळे टीव्हीएसएमची असामान्य दर्जा असलेली उत्पादने तयार करण्याची बांधिलकी अधोरेखित झाली आहे.

टीव्हीएस मोटर कंपनीचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी के एन राधाकृष्णन म्हणाले, 'वेगवेगळ्या उत्पादन विभागांत मिळालेले आघाडीचे स्थान ग्राहकांचा आमच्या उत्पादनांवर असलेला विश्वास दर्शवणारे आहे. ओनरशीपचा अनुभव, उत्पादनाचा दर्जा, अत्याधुनित तंत्रज्ञान, सौंदर्य आणि कलात्मक स्वरूप यांतून ग्राहकाला आनंद मिळवून देण्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. आमचे वितरक दैनंदिन पातळीवर करत असलेल्या प्रयत्नांबद्दल मी त्यांचे कौतुक करतो. त्याचप्रमाणे टीव्हीएस मोटरची टीम आणि पुरवठादार भागिदारांचाही मी आभारी आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, ग्राहकांनी दाखवलेला विश्वास आणि प्रोत्साहनामुळे मी त्यांचा ऋणी आहे.'

इंडिया क्यूएस पुरस्कार

दुचाकी इनिशियल क्वालिटी स्टडीमध्ये (आयक्यूएस) ओनरशीपनंतरच्या सहा महिन्यांत दुचाकीच्या दर्जाचे मूल्यमापन केले जाते. त्यामध्ये कंपनीच्या वेगवेगळ्या मॉडेल्सनी असामान्य कामगिरी केली.

• टीव्हीएस ज्युपिटर 125 इनिशियल क्वालिटीमध्ये #1 एक्झक्युटिव्ह स्कूटर ठरली.

o त्याशिवाय इनिशियल क्वालिटीमध्ये ती #2 इकॉनॉमी स्कूटर ठरली.

• टीव्हीएस रेडॉन ही #1 इकॉनॉमी मोटरसायकल ठरली.

• टीव्हीएस अपाचे आरटीआर 160 2V ही इनिशियल क्वालिटीमध्ये #1 प्रीमियम मोटरसायकल ठरली.

• टीव्हीएस रेडर इनिशियल क्वालिटीमध्ये #2 एक्झक्युटिव्ह मोटरसायकल ठरली.

इंडिया अपील पुरस्कार

नाविन्य आणि गुणवत्तेप्रती कंपनीची बांधिलकी जे.डी. प़वर २०२४ इंडिया टु- व्हीलर अपील स्टडीमध्ये कंपनीला मिळालेल्या पाचपैकी चार पुरस्कारांवरून दिसून आली आहे.

• टीव्हीएस ज्युपिटर ही मोस्ट अपिलिंग इकॉनॉमी स्कूटर.

• टीव्हीएस रेडॉन ही मोस्ट अपिलिंग इकॉनॉमी मोटरसायकल.

• टीव्हीएस रेडर ही मोस्ट अपिलिंग एक्झक्युटिव्ह मोटरसायकल.

• टीव्हीएस अपाचे RTR 2V ही मोस्ट अपिलिंग प्रीमियम मोटरसायकल.

• टीव्हीएस NTORQ ही दुसऱ्या क्रमाकांची ही मोस्ट अपिलिंग एक्झक्युटिव्ह मोटरसायकल.

टीव्हीएस मोटर कंपनीच्या उत्पादनांनी पाचपैकी चार विभागांत पुरस्कार मिळवत आपण या उद्योगात आघाडीवर असल्याचे अधोरेखित केले आहे. ती आता बाजार भांडवलानुसार जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मूल्य असलेली कंपनी आणि जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी दुचाकी आणि तीन चाकी उत्पादक आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande