आणखी दीड वर्षात तापीमाईचे पाणी तुमच्या शेतापर्यंत पोहोचेल - खा. डॉ. सुभाष भामरे
धुळे , 20 एप्रिल (हिं.स.) कायमस्वरूपी दुष्काळाचा कलंक माथी लागलेल्या धुळे व शिंदखेडा तालुक्यांना शाप
आणखी दीड वर्षात तापीमाईचे पाणी तुमच्या शेतापर्यंत पोहोचेल - खा. डॉ. सुभाष भामरे


धुळे , 20 एप्रिल (हिं.स.) कायमस्वरूपी दुष्काळाचा कलंक माथी लागलेल्या धुळे व शिंदखेडा तालुक्यांना शापमुे करण्यासाठी आमदार जयकुमार रावल यांच्या साथीने आपण केंद्राकडून सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेसाठी २५०० कोटींचा निधी आणला. या प्रकल्पाचे काम पूर्णत्वास आले असून, आणखी दीड वर्षात तापीमाईचे पाणी तुमच्या शेतांपयरत पोहोचेल. आता संपूर्ण मतदारसंघाला सुजलाम-सुफलाम करण्यासाठी नार-पार प्रकल्पाच्या पूर्तीचाच ध्यास बाळगला आहे. त्यासाठी जास्तीत जास्त मताधिक्याने मला पुन्हा संसदेत पाठवा, असे आवाहन लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी आज केले.

दरम्यान, तापी-बुराई सिंचन प्रकल्पासह शिंदखेडा तालुक्यातील विकासकामांची खासदार डॉ. भामरे व मी अशी दोघे मिळून गॅरंटी देतो. मात्र, शिंदखेडा तालुक्यातील एक लाखांहून अधिक मताधिक्याची गॅरंटी तुम्ही आम्हाला द्या, असे आवाहन आमदार जयकुमार रावल यांनी केले. शिंदखेडा येथील बिजासनी मंगल कार्यालयात आज दुपारी खासदार डॉ. भामरे यांच्या प्रचारार्थ शिंदखेडा तालुक्यातील पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकत्यारचा मेळावा झाला. त्यात डॉ. भामरे बोलत होते.

तत्पूर्वी खासदार डॉ. भामरे व शिंदखेड्याचे आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते साळवे येथील आदिशी पेडकाईमाता व पाटण येथील आशापुरी मातेचे दर्शन घेत, महाआरती करत डॉ. भामरे यांच्या प्रचाराचे नारळ वाढवून आशीर्वाद घेण्यात आला.

खासदार डॉ. भामरे म्हणाले, की लढाई ही लढाई असते. ती लढायची असते. त्यामुळे कुणीही गाफील न राहता आपले नेते नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी सज्ज व्हा. आज पेडकाईमाता व आशापुरी मातेचा आशीर्वाद घेत तालुक्यातील प्रचाराचा श्रीगणेशा केला आहे. २०१४ व २०१९ मध्ये तुम्ही मोठ्या मतांनी मला संसदेत पाठविले. यावेळी आमदार रावल यांनी एक लाखांचे मताधिक्य देण्याचा शब्द दिला आहे. तो खरा करण्याची जबाबदारी आता तुमची आहे. आमदार रावल यांच्या साथीने मतदारसंघातील सिंचनासह विकासाचे बहुतांश प्रश्न सोडविले. तापी-बुराई सिंचन प्रकल्पाला नुकतीच सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. आता केंद्राकडून १००० कोटी रुपयांचा निधी आणण्याची जबाबदारी माझी आहे. याद्वारे कायमस्वरूपी दुष्काळाचा कलंक पुसून संपूर्ण तालुका सुजलाम-सुफलाम होईल.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande