माझ्या मुलीची हत्या लव्ह जिहादच- निरंजन हिरेमठ
बंगळुरू, 20 एप्रिल (हिं.स.) : कर्नाटकातील नेहा हिरेमठ हत्याकांड हे लव्ह जिहाद असल्याचा आरोप भाजपने क
संग्रहित


बंगळुरू, 20 एप्रिल (हिं.स.) : कर्नाटकातील नेहा हिरेमठ हत्याकांड हे लव्ह जिहाद असल्याचा आरोप भाजपने केला होता. तर काँग्रेसने हे हा आरोप नाकारला होता. परंतु, काँग्रेस नेते असलेले नेहाचे वडिल निरंजन हिरेमठ यांनी देखील हे प्रकरण लव्ह जिहाद असल्याचे सांगत पक्षविरोधी भूमिका घेतली आहे.

काँग्रेस नगरसेवक निरंजन हिरेमठ यांची 23 वर्षीय मुलगी नेहा हिरेमठ हिची 18 एप्रिल रोजी कर्नाटकातील हुबळी येथील बीव्हीबी कॉलेज कॅम्पसमध्ये भोसकून हत्या करण्यात आली होती. नेहा एमसीएच्या प्रथम वर्षाची विद्यार्थिनी होती. याच महाविद्यालयातील विद्यार्थी फैयाज खोंडुनाईक याने नेहाच्या मानेवर व पोटावर चाकूने सात वार केले.या हल्ल्यात आरोपी फैयाजलाही दुखापत झाली आहे. दोघांनाही रुग्णालयात नेण्यात आले, तेथे नेहाला मृत घोषित करण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये फैयाज नेहावर हल्ला करताना दिसत आहे. या घटनेनंतर भाजपचे स्थानिक नेते आणि केंद्रीय नेत्यांनी देखील हे प्रकरण लव्ह जिहाद असल्याचा आरोप केला. तसेच कर्नाटकातील कायदा-सुव्यवस्था संपुष्टात आल्याचेही भाजपने म्हंटले होते. भाजपच्या या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी लव्ह जिहादचे दावे फेटाळून लावलेत. तसेच वैयक्तिक कारणावरून ही हत्या करण्यात आली असून राज्यात कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे सुरळीत असल्याचे त्यांनी सांगितले होते.

यापार्श्वभूमीवर काँग्रेस नेते असलेले नेहाचे वडिल निरंजन हिरेमठ यांनी सांगितले की, आरोपींने नेहाला अडकवण्याचा कट रचला होता. तसेच तिला धमक्या देत होते, पण आमच्या मुलीने त्याकडे लक्ष दिले नाही. हा लव्ह जिहाद नाही तर काय आहे ? लव्ह जिहादसाठी ते चांगल्या कुटुंबातील मुलींना टार्गेट करतात. लवकरात लवकर त्याचा सामना करावा किंवा फाशी द्यावी. पोलिसांनी 18 एप्रिल रोजी सांगितले होते की नेहा आणि फैयाज एकमेकांना आधीच ओळखत होते. दोघेही बीसीएच्या काळात वर्गमित्र होते. नेहाने त्याचे प्रपोजल नाकारले होते, त्यामुळे फैयाजने ही घटना घडवून आणली. दरम्यान या हत्याकांडानंतर विद्यार्थी संघटना उग्र झाल्या असून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने नेहा हिरेमठला न्याय मिळावा म्हणून आंदोलन केले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande