माझ्या पात्रासाठी मी 'गोलमाल'मधल्या 'वसूली भाई'मधून प्रेरणा मिळवली - केतन सिंह
मुंबई, 20 एप्रिल (हिं.स.) या रविवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हस
Ketan singh


मुंबई, 20 एप्रिल (हिं.स.) या रविवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’च्या आणखी एका हास्य-स्फोटक भागात प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसूझा येणार आहे. या शोमधले कसलेले विनोद धुरंधर आणि मॅडनेस की मालकीन हुमा कुरेशी आपल्या धमाल अॅक्ट्स आणि रंजक गॅग्जनी सगळ्यांना भरपूर हसवतील.

या भागात, लोकांच्या मागणीला मान देऊन ‘सायको-बायको’ शृंखलेतील आणखी एक अॅक्ट ‘EMI अॅक्ट’च्या रूपात सादर होणार आहे. यामध्ये कुशल बद्रिके एका त्रासलेल्या नवऱ्याच्या रूपात असेल, कॉमेडी क्वीन हेमांगी कवी आपल्या पतीला सतत टोकणाऱ्या पत्नीच्या रूपात दिसेल. तर, केतन सिंह एका कर्ज वसूली अधिकाऱ्याच्या रूपात दिसेल. यातला नवरा आपल्या बायकोसाठी एक सर्प्राइज बर्थडे पार्टी आयोजित करतो, पण त्याच वेळी कर्ज वसूली अधिकारी दारात आल्यामुळे त्याच्या योजनेचा बट्टयाबोळ होतो.

या गॅगविषयी बोलताना कुशल बद्रिके म्हणतो, “आमच्या सायको-बायको अॅक्ट्सवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. आमच्या या आगामी EMI अॅक्टमध्ये या मालिकेतला पुढचा अॅक्ट आम्ही यावेळी सादर करत आहोत, जो धमाल विनोदी आहे आणि प्रेमाचा गोडवा देखील त्यात आहे. यावेळी या अॅक्टमध्ये एका नवऱ्याची गोष्ट आहे जो EMI च्या जंजाळात अडकला आहे आणि अशा वेळी त्याची चतुर बायको त्याच्या मदतीला धावून येते. हेमांगी कवी आणि केतन सिंह यांच्यासोबत काम करताना खूप मजा येते. मंचावर आमची केमिस्ट्री मस्त जमली आहे, त्यामुळे अॅक्ट जिवंत वाटतो. हुमा कुरेशी आणि रेमो डिसूझा या दोघांना आमचा परफॉर्मन्स खूप आवडला आणि एक गोड ट्विस्ट असलेल्या या विनोदी अॅक्टचे त्यांनी खूप कौतुक केले. मला आशा आहे की प्रेक्षकांना देखील हा अॅक्ट बघताना धमाल येईल!”

विनोदवीर केतन सिंह पुढे म्हणाला “आगामी गॅगमध्ये मी एका कर्ज वसूली अधिकाऱ्याची भूमिका करणार आहे, जो नकळतपणे एका सर्प्राइज पार्टीत विघ्न आणतो. या भूमिकेसाठी मी ‘गोलमाल’ चित्रपटातल्या ‘वसूली भाई’ या प्रसिद्ध पात्रातून प्रेरणा घेतली. हेमांगी कवी आणि कुशल बद्रिके यांच्यासोबत काम करताना नेहमीच खूप मजा येते. त्यांचे कॉमिक टायमिंग आणि हुशारी यामुळे हा अॅक्ट खूपच मस्त झाला आहे. प्रेक्षकांची या अॅक्टवरची प्रतिक्रिया बघण्यासाठी मी उत्सुक आहे. ते नक्की मनमुराद हसतील आणि आमचा अॅक्ट डोक्यावर घेतील.”

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande