'धर्मा- दि एआय स्टोरी' चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान पुष्कर जोगला गंभीर दुखापत
मुंबई, 20 एप्रिल (हिं.स.) काही दिवसांपूर्वीच पुष्कर जोगने 'धर्मा- दि एआय स्टोरी' या चित्रपटाची सोशल
Pushkar jog


मुंबई, 20 एप्रिल (हिं.स.) काही दिवसांपूर्वीच पुष्कर जोगने 'धर्मा- दि एआय स्टोरी' या चित्रपटाची सोशल मीडियावर घोषणा केली होती. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित या चित्रपटाचे स्कॅाटलॅंडमध्ये चित्रीकरण सुरु असताना ॲक्शन सीन करताना झालेल्या अपघातात अभिनेता पुष्कर जोग याला गंभीर दुखापत झाली.

या अपघातात त्याच्या गुडघ्याला आणि हाताला जबर मार बसला आहे. दरम्यान, पुष्कर जोग मुंबईत दाखल झाला असून लवकरच तो चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande