डॉ. श्रीराम केळकर यांची संस्थान श्री देव गणपतीपुळे सरपंचपदी निवड
रत्नागिरी, 20 एप्रिल, (हिं. स.) : प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथील संस्थान श्रीदेव गणपतीपुळे पं
डॉ. श्रीराम केळकर यांची संस्थान श्री देव गणपतीपुळे सरपंचपदी निवड


रत्नागिरी, 20 एप्रिल, (हिं. स.) : प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथील संस्थान श्रीदेव गणपतीपुळे पंचकमिटीच्या नव्या सरपंचपदी मालगुंड येथील डॉ. श्रीराम विश्वनाथ केळकर यांची निवड झाली आहे.

संस्थानाच्या पंचकमिटीने एकमताने ही निवड केली आहे. याबद्दल परिसरातून डॉ. केळकर यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. कै गोविंद केळकर, कै शंकर केळकर, कै. विश्वनाथ केळकर यांच्यानंतर डॉ. श्रीराम केळकर यांच्या रूपाने केळकर घराण्यातील चौथी पिढी श्रींच्या सेवेत कार्य करत आहे. डॉ. केळकर २००९ पासून ते पंच म्हणून कार्यरत होते. आता त्यांची सरपंचपदी निवड झाली आहे.

अतिशय शांत, प्रेमळ व मनमिळाऊ स्वभाव आणि अत्यंत हुशार व अभ्यासू व्यक्तिमत्त्व असलेल्या केळकर यांची निवड संस्थानच्या पंचकमिटीवर झाल्याने परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande