चॉकलेट खाल्याने बालिकेला रक्ताच्या उलट्या
चंदीगड, 20 एप्रिल (हिं.स.) : पंजाबमध्ये चॉकलेट खाल्ल्यामुळे दीड वर्षाच्या मुलीला रक्ताच्या उलट्या झा
संग्रहित


चंदीगड, 20 एप्रिल (हिं.स.) : पंजाबमध्ये चॉकलेट खाल्ल्यामुळे दीड वर्षाच्या मुलीला रक्ताच्या उलट्या झाल्याची धक्कादायक घटना घडली. रविया असे या बालिकेचे नाव असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलेय.

यासंदर्भातील माहितीनुसा लुधियाना येथील रविया नामक बालिका काही दिवसांपूर्वी कुटुंबासह पटियाला येथे गेली होती. त्याठिकाणी तिने एका दुकानातून चॉकलेट खरेदी केले. घरी येऊन चॉकलेट खाल्ल्यानंतर तिला उलटी होऊ लागली. सुरुवातीला घरच्यांना वाटले की ही एक सामान्य गोष्ट आहे. परंतु, मुलीची प्रकृती सतत खराब होत गेली. त्यानंतर 22 वर्षांच्या तरुणीने चॉकलेट खाल्ल्यानंतर तिचीही प्रकृती बिघडली. त्यानंतर घरच्यांना संशय आल्याने त्यांनी बालिकेला तातडीने डॉक्टरांकडे नेले. मात्र, मुलीची प्रकृती गंभीर झाल्याने डॉक्टरांनी संबंधित मुलीला सीएमसी रुग्णालयात दाखल केले, जिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत.

याबाबत माहिती मिळाल्यानंतर नातेवाईक पुन्हा त्याच चॉकलेटच्या दुकानात गेला. तिथे एक्स्पायरी डेटचा माल आढळून आला. हा प्रकार कळताच त्याने आरोग्य विभागाकडे तक्रार करण्यात आली. यानंतर ते आरोग्य अधिकाऱ्यांच्या पथकासह त्या दुकानात गेले. त्यानंतर त्यांनी एक्सपायरी डेटचा सर्व माल जप्त केला. यानंतर पोलिसांनाही तेथे पाचारण करण्यात आले. पोलिसांनी कुटुंबीयांचे जबाब नोंदवले, त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मुदत संपलेल्या मालाच्या विक्रीची तपासणी आरोग्य विभागाने सुरू केली आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande