नाशिकच्या ईश्वरी सावकारची यंदा देखील निवड
नाशिक, २१ एप्रिल, (हिं. स) नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या ईश्वरी सावकार महिलांच्या २३ वर्षांखाल
नाशिकच्या ईश्वरी सावकारची यंदा देखील निवड


नाशिक, २१ एप्रिल, (हिं. स) नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या ईश्वरी सावकार महिलांच्या २३ वर्षांखालील वयोगटात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ - बीसीसीआय - तर्फे आयोजित नॅशनल क्रिकेट अकादमी - एन सी ए - च्या राष्ट्रीय पातळीवरील उच्च-कार्यक्षमता शिबिर ( HIGH-PERFORMANCE CAMP ) - हाय परफॉरमन्स शिबिरासाठी निवड झाली आहे. ईश्वरी सावकारची याआधीच्या दोन हंगामात देखील एन सी ए कॅम्प तसेच बीसीसीआयच्या हाय परफॉरमन्स शिबिरासाठी देखील निवड झाली होती. माजी कसोटीपटू व्हि व्हि एस लक्ष्मण प्रमुख असलेल्या एन सी ए, बेंगळुरू तर्फे भारतभरातील उदयोन्मुख , होतकरू खेळाडूंसाठी हे शिबीर होणार आहे. विविध स्पर्धेतील लक्षणीय कामगिरीच्या जोरावर ईश्वरी सावकारची हि निवड होत आली आहे. २२ एप्रिल ते १६ मे २०२३ दरम्यान हे राष्ट्रीय पातळीवरील शिबिर होत आहे. या अंतर्गत ईश्वरी सावकार बेंगळुरूला रवाना होईल.

या महत्वाच्या शिबिरासाठी झालेल्या निवडीबद्दल, नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ईश्वरीचे खास अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande